*(स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई)*
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क
*(13,00,000/- रुपये किमतीचा पाण्याचा टँकर चोरणाऱ्या 2 चोरट्यांना 24 तासामध्ये जेरबंद करुन चोरीस गेलेला पाण्याचा टँकर हस्तगत.)*
दिनांक 26/07/2026 रोजीचे सायंकाळी 19.00 वा.ते दिनांक 28/07/2026 रोजीचे सायंकाळी 18.00 वा.चे दरम्यान मौजे पाडेगाव, ता.फलटण, जि.सातारा गावचे हद्दीतील शेती संशोधन केंद्र पाडेगाव कार्यालयाचे जवळील मोकळ्या जागेत पार्किंग करीता लावलेला सगुणामाता कन्स्ट्रक्शन प्रा.लि.फलटण या कंपनीचा 13,00,000/- रुपये किमतीचा पाण्याचा टँकर कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला असलेबाबत दिलेल्या तक्रारीवरुन लोणंद पोलीस ठाणे गु.र.नं.336/2026 BNS कलम 303(2) अन्वये नोंद करण्यात आलेला आहे.
श्री.निखील पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ.वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. त्या प्रमाणे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांचे अधिपत्याखाली एक तपास पथक तयार करुन त्यांना वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.
दिनांक 29/07/2026 रोजी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, लिंबखिंड परिसरातील नॅशनल हायवेच्या सर्व्हिस रोडला दोन इसम निळे पांढरे रंगाचा टँकर घेवून तो विक्री करण्यासाठी गिऱ्हाईक शोधत आहेत अशी माहिती प्राप्त होताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांचे तपास पथकास प्राप्त माहितीचे ठिकाणी जावून शहानिशा करुन काही आक्षेपार्ह प्रकार आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे तपास पथक तात्काळ लिंबखिंड येथे रवाना झाले. लिंबखिंड येथील सर्व्हिस रोडला आल्यानंतर पथकास एक MH-12-DT-3139 क्रमांकाचा निळे पांढरे रंगाचा टाटा कंपनीचा पाण्याचा टँकर उभा असलेला दिसला. त्या टँकरच्या शेजारी स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक MH-53-4944 वर दोन इसम बसलेले दिसून आले. त्यांना सदरचा टँकर कोणाचा आहे असे विचारले असता त्यांनी सदरचा टँकर त्यांचाच असले बाबत सांगितले. तपास पथकाने त्यांना टँकरच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी समाधानकारक व उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे त्याबाबत सखोल विचारपूस केली असता त्यांनी सदरचा टँकर त्यांचा आणखी एक मित्र याचे मदतीने मौजे पाडेगाव, ता.फलटण, जि.सातारा गावचे हद्दीतील शेती संशोधन केंद्र पाडेगाव कार्यालयाचे जवळील मोकळ्या जागेतून चोरी करुन आणला असल्याचे सांगून सदरचा टँकर विक्री करीता गिऱ्हाईक शोधत असल्याचे सांगितल्याने लोणंद पोलीस ठाणे गु.र.नं.336/2026 BNS कलम 303(2) हा वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून 13,00,000/- रुपये किमतीचा टँकर (मुद्देमाल) हस्तगत करण्यात आलेला आहे.
श्री.निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ.वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सपोनि अभिजीत यादव, रोहीत फरांदे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, चंद्रकांत पुजारी, पोलीस अंमलदार संतोष सपकाळ, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, मंगेश महाडीक, सनी आवटे, हसन तडवी, अमोल माने, राकेश खांडके, सुजित भोसले, अमित झेंडे, मुनीर मुल्ला, अजय जाधव, नवनाथ कदम, मनोज जाधव, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, राजु कांबळे, अरुण पाटील, शिवाजी भिसे, स्वप्नील दोंड, विजय निकम यांनी सदरची कारवाई केलेली आहे.


























