Homeताज्या बातम्या*फलटण तालुक्यात गहू काढणी अंतिम टप्प्यात.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ*

*फलटण तालुक्यात गहू काढणी अंतिम टप्प्यात.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ*

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

फलटण

फलटण तालुक्यात रब्बी हंगामातील गव्हाची काढणी सध्या अंतिम टप्यात पोहोचली असून, अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे उर्वरित गहू काढणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गव्हाचे पीक घेण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्याभरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी, उर्वरित गहू सुरक्षितपणे काढून घेण्यासाठी शेतकरी वर्गात घाईगडबड सुरू आहे. गेल्या महिन्याभरापासून पंजाब व हरियाणा राज्यांतून गहू काढणीसाठी हार्वेस्टर मशीन तालुक्यात दाखल झाल्या आहेत. सध्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर हार्वेस्टर मालकांकडून प्रती एकर तीन ते साडेतीन हजार रुपये दर आकारला जात आहे. तथापि, यावर्षी मशीनची संख्या वाढल्यामुळे दरांमध्ये स्पर्धा निर्माण झाली असून काही ठिकाणी कमी दरातही गहू काढणी केली जात असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यंदा गव्हाला अनुकूल वातावरण मिळाल्याने पीक चांगले आले असून, एकरी उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असले, तरी अवकाळी पावसाच्या भीतीमुळे काढणीची घाई सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पावसात झाडांना टँकरने पाणी दिल्याने संताप

नागरिक कार्यकर्ते संदीप खर्डेकर यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली असून, पाण्याचा असा अपव्यय तातडीने थांबवावा. पुणे : शुक्रवारी मुसळधार पाऊस...

पुण्यात विदेशी भाज्यांचे दर वाढल्याने निरोगी खाण्याला प्रीमियम मिळतो

उशीर झालेला मान्सून आणि अनियमित पावसामुळे पिकांचे चक्र विस्कळीत झाले आहे आणि उत्पादनात घट झाली आहे ज्यामुळे विदेशी भाज्यांचे दर वाढले आहेत. पुणे...

लोहगड खून प्रकरणाचा ट्विस्ट: कटाची ‘माहिती’ असलेल्या मित्राचा दावा आहे की त्याने चेतन चौधरी...

चेतन चौधरी आणि सिया गोयल या दोन आरोपींनी चेतनचा मित्र आणि वर्गमित्र असलेल्या तरुणाशी त्यांच्या कथित योजनेबद्दल चर्चा केल्याचा पोलिसांचा दावा आहे. पुणे:...

*स्मार्ट मीटर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी”*

"स्मार्ट मीटर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी" समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण, दि. ३ जुलै : राज्यात सुरू असलेल्या स्मार्ट...

*पोलिस अधीक्षकांकडून पालखी मार्गाची पाहणी*

पोलिस अधीक्षकांकडून पालखी मार्गाची पाहणी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण जिल्ह्यातून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा १५ ते १८ जुलैदरम्यान मार्गक्रमण करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस...

error: Content is protected !!