Homeताज्या बातम्या*फलटण येथे बेकायदेशीर मळी वाहतूक उघड; पीयूसी, इन्शुरन्स व फिटनेसशिवाय टँकर रस्त्यावर*

*फलटण येथे बेकायदेशीर मळी वाहतूक उघड; पीयूसी, इन्शुरन्स व फिटनेसशिवाय टँकर रस्त्यावर*

फलटण येथे बेकायदेशीर मळी वाहतूक उघड; पीयूसी, इन्शुरन्स व फिटनेसशिवाय टँकर रस्त्यावर

फलटण प्रतिनिधी :- समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

फलटण तालुक्यात मळी (डिस्टिलरी वेस्ट) वाहतुकीसाठी वापरले जाणारे अनेक टँकर बेकायदेशीररित्या रस्त्यावर धावत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या टँकरकडे आवश्यक कागदपत्रांचा पूर्ण अभाव असून, त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, अनेक टँकरकडे पी.यू.सी. (Pollution Under Control) प्रमाणपत्र नाही, इन्शुरन्स (विमा) नाही तसेच फिटनेस सर्टिफिकेट नसतानाही हे टँकर खुलेआम मळीची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

मळी ही अत्यंत प्रदूषणकारी आणि पर्यावरणासाठी घातक घटक मानली जाते. अशा प्रकारच्या रासायनिक द्रवाची वाहतूक करताना शासनाने कडक नियम व अटी घालून दिलेल्या आहेत. मात्र, फलटण तालुक्यात हे सर्व नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे चित्र आहे. बेकायदेशीर टँकरद्वारे मळीची वाहतूक होत असल्याने रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला असून, एखादा अपघात झाल्यास मळी सांडून शेती, पाणीस्रोत आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे संबंधित प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष. राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच आरटीओ प्रशासन यांच्याकडून या टँकरांची कोणतीही ठोस तपासणी होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कोट्यवधी रुपयांच्या या अवैध व्यवसायामुळे शासनाचा महसूलही मोठ्या प्रमाणावर बुडत असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, काही टँकरवर नोंदणी क्रमांक अस्पष्ट असल्याचे, तर काही ठिकाणी बनावट नंबर प्लेटचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ नियमभंगापुरता मर्यादित नसून, मोठ्या गैरव्यवहाराशी संबंधित असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. बेकायदेशीर टँकर जप्त करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, सर्व टँकरची कागदपत्रे तपासावीत आणि मळी वाहतुकीवर कडक नियंत्रण आणावे, अशी मागणी जोर धरत आहे. आता प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रहिवाशांच्या विरोधानंतर पीसीएमसी स्थायी समितीने पुनावळे शाळेचा जमीन भाडेपट्टा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठवला

पुणे : रहिवाशांच्या तीव्र विरोधाला तोंड देत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी पुनावळे येथील शैक्षणिक संस्थेसाठी आरक्षित असलेला भूखंड खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा...

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत गुन्हेगारी वृत्तीने डोके वर काढले : रोहित पवार

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर स्थानिक प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याने बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक डोके वर काढत असल्याचा दावा...

नवीन बससेवेचे उद्दिष्ट हिंजवडी तंत्रज्ञांना 70 मार्गांवर प्रवासात दिलासा देण्याचे आहे

पुणे : शहरातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो व्यावसायिकांना गेल्या काही वर्षांत वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांशी सामना करावा लागत आहे....

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीची पकड, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

महा सर्वेक्षण पॉलिसीसाठी 54L एकल महिलांची ओळख पटवते, संख्या 75L पर्यंत वाढू शकते

पुणे: महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मंगळवारी सांगितले की, अशा एकल महिलांची संख्या आता 54 लाखांच्या आसपास आहे, परंतु समाजातील या विभागासाठी...

error: Content is protected !!