Homeताज्या बातम्यामाजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे गौरवोद्गार; श्री सद्गुरू प्रतिष्ठानच्या फलटण फेस्टिव्हल...

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे गौरवोद्गार; श्री सद्गुरू प्रतिष्ठानच्या फलटण फेस्टिव्हल २०२६ चा दिमाखदार शुभारंभ

शहराचा पुसट झालेला सांस्कृतिक वारसा गडद करण्याचे काम फलटण फेस्टिव्हलच्या माध्यमातून सुरू!

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे गौरवोद्गार; श्री सद्गुरू प्रतिष्ठानच्या फलटण फेस्टिव्हल २०२६ चा दिमाखदार शुभारंभ

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

फलटण, प्रतिनिधी : शहराला सांस्कृतिक वारसा नसेल, तर शहराच्या विकासाला संस्कृतीची जोड मिळत नाही. आज सोसायटी कल्चर लोप पावत असताना फलटण शहराचा पुसट झालेला सांस्कृतिक वारसा पुन्हा गडद करण्याचे काम दिलीपसिंह भोसले यांनी फलटण फेस्टिव्हलच्या माध्यमातून सुरू केले आहे, असे गौरवोद्गार माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काढले.

श्री सद्गुरू प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणात २४ ते २८ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘फलटण फेस्टिव्हल २०२६’ चा शुभारंभ माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात झाला. यावेळी ते बोलत होते. उद्घाटन सोहळ्याला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कायमस्वरूपी सुविधा उभारणार!

यावेळी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, दिलीपसिंह भोसले हे सहकार, उद्योग, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले नेतृत्व आहे. भोसले कुटुंबीयांकडून फलटण तालुक्याला सातत्याने काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

फलटण शहरात पूर्वीप्रमाणे मनोरंजनासाठी हक्काचे ठिकाण उरले नसल्याची खंत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, मागील काळातील राजकारणामुळे सार्वजनिक जागांवरील आरक्षणे उठवून त्या ठिकाणी काँक्रीटची जंगले उभी राहिली आहेत. मात्र, आता फलटण शहरासाठी नवीन सांस्कृतिक भवन मंजूर झाले असून, रस्त्यांची कामेही सिमेंट काँक्रीटच्या माध्यमातून होत आहेत. नगराध्यक्ष आणि त्यांची टीम शहराच्या मूलभूत गरजांसाठी काम करत आहे. शहराला कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देत त्यातून समृद्ध सांस्कृतिक वारसा निर्माण करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

व्यापारी आणि महिलांच्या गृहउद्योगांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!

आमदार सचिन पाटील म्हणाले की, यंदा दुष्काळाचे सावट असले, तरी सणासुदीच्या काळात शहरातील नागरिकांना आनंदाचे क्षण अनुभवता आले पाहिजेत. फलटण फेस्टिव्हलच्या माध्यमातून व्यापारी वर्गाला तसेच महिलांच्या गृहउद्योगांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या व्यवसायाला आर्थिक चालना मिळावी, हा या महोत्सवामागील मुख्य उद्देश आहे. दिलीपसिंह भोसले यांनी सुरू केलेला हा उपक्रम अभिनंदनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

फलटणकरांसाठी सांस्कृतिक पर्वणी!

फलटण फेस्टिव्हलचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी महोत्सवाच्या आयोजनाविषयी माहिती देताना सांगितले की, फलटण फेस्टिव्हलचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आले आहे. या महोत्सवामुळे फलटणकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी उपलब्ध झाली आहे. पुढील चार दिवस येथे विविध दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, फलटणकर नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित राहून या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मान्यवरांची उपस्थिती; माजी खासदारांचा गौरव

कार्यक्रमादरम्यान माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मानपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. मानपत्राचे वाचन श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप जगताप यांनी केले.

यावेळी आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले, उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी-बेडके, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे, श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, फलटण फेस्टिव्हलचे कार्याध्यक्ष रणजितसिंह भो, उपाध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ, अमोल सस्ते, विक्रम भोसले, बजरंग गावडे, हेमंत बोरावके, उदयसिंह निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी फलटण फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ यांनी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे विभागीय केंद्र फलटण येथे सुरू करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे पदाधिकारी, संचालक मंडळ आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या फलटणकर नागरिकांच्या सहभागामुळे उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.

समर्थ २४ तास न्यूज नेटवर्क | फलटण

समर्थ नायक साप्ताहिक | फलटण

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोळकीतील खासगी क्लासमध्ये पाचवीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण! शिक्षिकेसह नववी-दहावीतील काही विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल;...

0
कोळकीतील खासगी क्लासमध्ये पाचवीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण! शिक्षिकेसह नववी-दहावीतील काही विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल; दहा वर्षीय मुलाच्या संपूर्ण अंगावर मारहाणीचे वन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण,...

मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात भोंडल्याचा उत्साहात उत्सव साजरा.

0
मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात भोंडल्याचा उत्साहात उत्सव साजरा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी भोंडल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात...

सांगवीतील घटनेचा फलटण तालुका मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध ग्रामीण पोलिसांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाई...

0
सांगवीतील घटनेचा फलटण तालुका मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण ग्रामीण पोलिसांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी फलटण, प्रतिनिधी : सांगवी येथे...

जाधववाडी बिरदेवनगर येथील श्री बिरदेव यात्रेदरम्यान जमाव व वाद्य वाजवण्यास, प्राण्याचा बळी देण्यास...

0
जाधववाडी बिरदेवनगर येथील श्री बिरदेव यात्रेदरम्यान जमाव व वाद्य वाजवण्यास, प्राण्याचा बळी देण्यास मनाई; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक आदेश समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण २४ ते...

मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. ललित वेळेकर यांना पीएच.डी. प्रदान

0
मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. ललित वेळेकर यांना पीएच.डी. प्रदान फलटण : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क मुधोजी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. ललित...

error: Content is protected !!