Homeताज्या बातम्या*फलटण शहरात १८ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ* *फलटण :*

*फलटण शहरात १८ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ* *फलटण :*

फलटण शहरात १८ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण

फलटण शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे शहराला पाणीपुरवठा करणारा मुख्य स्रोत असलेला निरा उजवा कालवा १२ जून २०२६ पासून बंद करण्यात आला असून तो पुढील सुमारे ४५ दिवस बंद राहणार आहे. धरण क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

फलटण नगरपरिषदेच्या साठवण तलावामध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा संपूर्ण शहराला पुढील ४५ दिवस पुरेल इतका नसल्याने नगरपरिषद प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवार, दि. १८ जून २०२६ पासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

नगरपरिषदेने प्रभागनिहाय पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर केले असून पेठ सोमवार संपूर्ण भाग, पेठ मंगळवार संपूर्ण भाग, पेठ महतपुरा आणि जिंती नाका परिसरात दि. १८, २०, २२, २४, २६, २८ व ३० जून रोजी पाणीपुरवठा केला जाणार आहे.

तर फलटण शहरातील उर्वरित सर्व भागांना दि. १९, २१, २३, २५, २७ व २९ जून रोजी पाणीपुरवठा करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कालवा बंद राहिल्यामुळे निर्माण झालेली ही पाणीटंचाई लक्षात घेऊन नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, नळांना तोट्या बसवाव्यात तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.

पुढील दीड महिन्याच्या कालावधीत सर्व नागरिकांना शक्य तितका नियमित पाणीपुरवठा करता यावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत   फलटण, समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर, विद्यानगर, फलटण येथे शैक्षणिक...

दर्जेदार शिक्षण समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे, असे विखे पाटील म्हणाले

मिलिंद जोशी यांनी संपादित केलेल्या आणि शिवाजीराव कदम यांना समर्पित 'अमृतसंचय' या स्मरणीय खंडाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुणे : राज्याचे जलसंपदा...

हिमालयातील रहस्यमय प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

हिमालयातील रहस्यमय प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण पुणे .येथील सावरकर अध्यापन केंद्रात डॉ. अर्जुन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिमालयातील दुर्गम भागात...

*उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजला आणि...

मुधोजी हायस्कूलमध्ये रंगला नवागतांचा स्वागत सोहळा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण   उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजला आणि पुन्हा...

*फलटण, दि.१५/०६/२०२६ : फलटण नगरपरिषद शाळा क्र. 3, मंगळवार पेठ फलटण येथे नवीन शैक्षणिक...

शाळा प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप उत्साहात समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण, दि.१५/०६/२०२६ : फलटण नगरपरिषद शाळा क्र. 3, मंगळवार पेठ फलटण येथे नवीन...

error: Content is protected !!