Homeताज्या बातम्या*ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, तहसील* *कार्यालयाशेजारी, फलटण...

*ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, तहसील* *कार्यालयाशेजारी, फलटण येथे रविवार, दि. ०५ जुलै २०२६ रोजी समितीमध्ये नव्याने कार्यरत* *झालेल्या पदाधिकारी व सदस्यांचा ओळखपत्र वितरण समारंभ* *उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मानवाधिकार* *जनजागृती, संघटन बळकटीकरण आणि सामाजिक बांधिलकी अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने* *आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास सातारा जिल्ह्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी, सदस्य, पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली*. *

फलटण | प्रतिनिधी

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, तहसील कार्यालयाशेजारी, फलटण येथे रविवार, दि. ०५ जुलै २०२६ रोजी समितीमध्ये नव्याने कार्यरत झालेल्या पदाधिकारी व सदस्यांचा ओळखपत्र वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मानवाधिकार जनजागृती, संघटन बळकटीकरण आणि सामाजिक बांधिलकी अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास सातारा जिल्ह्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी, सदस्य, पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा राष्ट्रीय सल्लागार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रणधीरजी भोसले होते. प्रमुख उपस्थितीमध्ये सातारा जिल्हाध्यक्ष बबनरावजी मदने, जनरल सेक्रेटरी राजेंद्र मदने, सातारा २४ तास न्यूजचे पत्रकार प्रवीण पोपट अहिवळे, संपर्क प्रमुख राजेंद्र नानासो मदने सातारा २४ तास तालुका प्रतिनिधी यांचा समावेश होता.

यावेळी बबनराव मदने, आनंदराव भोसले, प्रवीण अहिवळे, राजेंद्र मदने, निशिकांत अहिवळे, संपत गुंजवटे, दिलीप ननावरे, धर्मेंद्र चव्हाण, राणी धर्मेंद्र चव्हाण, हिंदुराव गायकवाड, जनार्दन बेंद्रे, सूर्यकांत काकडे, विशाल घनवट, निलेश बनसोडे, बाळासाहेब धुमाळ, रावसाहेब कदम, रामदास लांगी, प्रमोदजी सस्ते, बाबूराव शिरतोडे, शकील सय्यद, सुमन पोकळे, आशुतोष दडस आणि महावीर व्होरा यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्यांना अधिकृत ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. जे सदस्य कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांची ओळखपत्रे त्यांच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आली.

कार्यक्रमाला माध्यम क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही उपस्थिती लावली. दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी तथा सातारा जिल्हा भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष विकास शिंदे, दैनिक सातारा न्यूजचे उपसंपादक राजेंद्र बोंद्रे, साप्ताहिक समर्थ नायकचे संपादक गणेश भोईटे, @प्रगतिचळवळचे संपादक प्रमोदजी सस्ते, सातारा २४ तास न्यूजचे पत्रकार जुबेर कोतवाल, साथी मानवतेचाचे संपादक शकील सय्यद, साप्ताहिक साम्राज्य नायकचे संपादक हिंदुराव गायकवाड तसेच नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

याशिवाय रणरागिनी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटणच्या संस्थापिका-अध्यक्षा रझिया शेख, संस्थेचे सचिव मारुती बाळासाहेब टकले तसेच फलटण, कोरेगाव, माण, मेढा, जावळी, सातारा, बारामती आणि पुरंदर तालुक्यांतील ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडियाचे नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील विविध समित्यांतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला जिल्हास्तरीय स्वरूप प्राप्त झाले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मानवाधिकार संरक्षण, नागरिकांचे मूलभूत अधिकार, सामाजिक न्याय, कायद्याचे भान आणि जनजागृतीसाठी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी समाजातील वंचित, पीडित आणि गरजू घटकांच्या हक्कांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनरल सेक्रेटरी राजेंद्र मदने यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन प्रवीण पोपट अहिवळे यांनी केले. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत, परस्पर संवाद आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा ओळखपत्र वितरण सोहळा अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पाईपलाईन चाचणीत मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने पुण्यात नव्याने बांधलेला रस्ता खराब; व्हिडिओ व्हायरल

पुणे : पुण्याजवळील तळेगाव दाभाडे येथे नव्याने बांधलेला रस्ता महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाळ्यात पाईपलाईनच्या दाब चाचणीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने खराब झाला आहे.घटनास्थळावरील व्हिडिओंमध्ये...

*सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या...

प्रतिनिधी, दि. ५ : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारकास अखेर...

’17 दिवसात दोघेही आम्हाला सोडून गेले’: केतन अग्रवालच्या काकांनी रियाल्टरच्या मृत्यूनंतर आजोबांना दिलेला धक्का...

देवीचंद अग्रवाल (सी) यांच्या अंत्यसंस्कारानंतर बोलताना कुलदीप अग्रवाल (एल) म्हणाले की, 17 दिवसांच्या कालावधीत केतन आणि त्याचे आजोबा या दोघांच्याही मृत्यूमुळे कुटुंब उद्ध्वस्त...

मुसळधार पावसामुळे पुणे सोसायटीत भिंत कोसळली, 14 वाहनांचे नुकसान

मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे पुण्यातील कात्रज परिसरात एका निवासी सोसायटीची कंपाऊंड भिंत कोसळली, किमान 14 वाहनांचे नुकसान झाले (फोटो क्रेडिट: X) पुणे :...

‘मृत्यूपासून अस्वस्थ’: केतन अग्रवालच्या आजोबांना हृदयविकाराचा झटका, निधन

लोहगड किल्ल्यावर ज्यांच्या मृत्यूची कथित हत्या म्हणून चौकशी केली जात आहे अशा पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या आजोबांचा घटनेच्या आठवड्यांनंतर मृत्यू झाला आहे....

error: Content is protected !!