Homeताज्या बातम्या*फलटण पालिकेतील कर घोटाळा उघड! ऑनलाईन करप्रणालीत** *फेरफार करून* *लाखोंचा अपहार*; ...

*फलटण पालिकेतील कर घोटाळा उघड! ऑनलाईन करप्रणालीत** *फेरफार करून* *लाखोंचा अपहार*; *नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा मोठा खुलासा*

फलटण पालिकेतील कर घोटाळा उघड! ऑनलाईन करप्रणालीत फेरफार करून लाखोंचा अपहार;

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा मोठा खुलासा

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण

महानेट सॉफ्टवेअरमधील कथित छेडछाड, पावत्या डिलीट करून महसुलाला फटका; चौकशी समितीसमोर कर्मचाऱ्यांच्या लेखी कबुलीजबाबांमुळे खळबळ

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

फलटण :

फलटण नगर परिषदेमधील ऑनलाईन करप्रणालीत फेरफार करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करत चौकशी सुरू केल्यानंतर कर वसुली विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची चौकशी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात येत आहे.

नगराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी नगर परिषदेच्या विविध विभागांच्या कामकाजावर बारकाईने लक्ष केंद्रित केले. दरम्यान, कर भरणा आणि थकबाकी संदर्भात नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारींची पडताळणी करताना अनेक वर्षांपासून सुरू असलेला कथित कर घोटाळा उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, कर वसुली विभागातील काही कर्मचारी मोठ्या थकबाकीदार नागरिकांशी संपर्क साधून त्यांची थकबाकी कमी करून देण्याचे आमिष दाखवत होते. त्यांच्याकडून रोख स्वरूपात रक्कम स्वीकारली जात होती. मात्र, ही रक्कम नगर परिषदेच्या खात्यात जमा न करता स्वतःकडे ठेवली जात असल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित नोंदींमध्ये बदल करून थकबाकी भरल्याच्या पावत्या नागरिकांना दिल्या जात असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

या प्रकारासाठी ‘महानेट’ सॉफ्टवेअरचा कथित गैरवापर करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. काही कर्मचाऱ्यांनी सॉफ्टवेअरमधील नोंदी बदलणे, पावत्या डिलीट करणे आणि महसुली रकमेचा अपहार करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे चौकशी समितीसमोर लेखी स्वरूपात नमूद केले आहे.

तसेच मालमत्ता हस्तांतरण, नवीन नोंदणी, भाडेकरू नोंद कमी करणे तसेच मूल्यांकनाशी संबंधित कामांसाठी ५०० ते २००० रुपयांपर्यंत रक्कम घेतल्याची कबुली काही कर्मचाऱ्यांनी दिल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणात चार ते पाच कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नगराध्यक्षांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष समिती स्थापन केली असून दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनासह फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले…

“फलटणकरांच्या कराच्या प्रत्येक रुपयावर जनतेचा हक्क आहे. शहर विकासासाठी असलेला निधी कुणाच्याही खिशात जाऊ देणार नाही. या प्रकरणातील दोषींना कोणतीही माफी नाही. चौकशी पूर्ण होताच संबंधितांवर कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल. पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणे ही आमची बांधिलकी आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा*

0
### छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा मुंबईतील आंदोलन तीव्र करण्याचा दोन्ही पक्षप्रमुखांचा इशारा; महाराष्ट्र सैनिकांसह शिवसैनिकांची मोठी उपस्थिती समर्थ 24 तास...

माळजाई देवी मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती; शाल-श्रीफळ देऊन पत्रकारांचा सन्मान

0
माळजाई देवी मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती; शाल-श्रीफळ देऊन पत्रकारांचा सन्मान समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण पत्रकारिता हा लोकशाहीचा मजबूत आधारस्तंभ; जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे...

### 🎓 MS-CIT कोर्स करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! ### ₹२,००० शिष्यवृत्ती आणि ऑफिस ऑटोमेशन कोर्सचे...

0
### 🎓 MS-CIT कोर्स करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी!   ### ₹२,००० शिष्यवृत्ती आणि ऑफिस ऑटोमेशन कोर्सचे प्रमाणपत्र मोफत! समर्थ २४ तास न्यूज नेटवर्क, फलटण MS-CIT कोर्स करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसह...

*स्व. श्रीराज संजय दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिरात थंड पाण्याची सुविधा!*

0
🌺 *स्व. श्रीराज संजय दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिरात थंड पाण्याची सुविधा!* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण : सामाजिक बांधिलकी जपत प्रमोद निंबाळकर तथा...

*श्रीराम कारखाना सुरू होताच राजे गटाचा साखर पेढे वाटून जल्लोष*

0
श्रीराम कारखाना सुरू होताच राजे गटाचा साखर पेढे वाटून जल्लोष   रामराजेंच्या नेतृत्वाला संजीवराजे, चेअरमन-व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाच्या प्रयत्नांची साथ; ७० व्या गळीत हंगामाच्या शुभारंभाने...

error: Content is protected !!