Homeताज्या बातम्यागणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर साखरवाडी पंचक्रोशीतील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, सांस्कृतिक वारशाचे...

गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर साखरवाडी पंचक्रोशीतील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे आणि महिलांच्या कल्पकतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने पंचायत समिती फलटणच्या सभापती कु. शिवांजली हेमा विक्रमसिंह भोसले यांच्या पुढाकारातून गौरी-गणपती आरास सजावट स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे.

साखरवाडी पंचक्रोशीतील महिलांसाठी गौरी-गणपती आरास सजावट स्पर्धा

फलटण, दि. १७ (प्रतिनिधी) :

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण

गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर साखरवाडी पंचक्रोशीतील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे आणि महिलांच्या कल्पकतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने पंचायत समिती फलटणच्या सभापती कु. शिवांजली हेमा विक्रमसिंह भोसले यांच्या पुढाकारातून गौरी-गणपती आरास सजावट स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे.

साखरवाडी-पिंपळवाडी, फडतरवाडी, होळ आणि जिंती या चार गावांतील महिलांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, आपल्या कल्पकतेने, कलाकुसरीने व पारंपरिक पद्धतीने गौरी-गणपतीची आकर्षक आरास सजविणाऱ्या महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी ५ हजार ५५५ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ४ हजार ४४४ रुपये, तृतीय क्रमांकासाठी ३ हजार ३३३ रुपये, तर चतुर्थ क्रमांकासाठी २ हजार २२२ रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. याशिवाय पाच विशेष बक्षिसे आणि पाच साड्या देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकालाही आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

स्पर्धेसाठी १७ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार असून, १८ व १९ सप्टेंबर रोजी सहभागी स्पर्धकांच्या घरातील गौरी-गणपती आरास सजावटीची पाहणी व निरीक्षण करण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महिलांनी आपल्या घरातील गौरी-गणपती सजावटीचे फोटो किंवा व्हिडिओ WhatsApp क्रमांक 8830285954 वर पाठवावेत. त्यासोबत स्पर्धकाचे संपूर्ण नाव, गावाचे नाव आणि संपूर्ण पत्ता पाठविणे आवश्यक आहे.

महिलांनी या सांस्कृतिक उपक्रमात मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कलाकुसरीला व कल्पकतेला व्यासपीठ मिळवून द्यावे, असे आवाहन पंचायत समिती फलटणच्या सभापती कु. शिवांजली हेमा विक्रमसिंह भोसले यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश…* *शंभूराज...

0
*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश...* *शंभूराज वर कौतुकाचा वर्षाव* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण मुर्तीजापुर अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय...

*रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही; जयकुमार गोरे यांचा निर्धार*

0
*रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही; जयकुमार गोरे यांचा निर्धार* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण सुरवडी : फलटणचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे...

*लहान वयातच वाहतूक नियमांचे संस्कार करा : सचिन विधाते*

0
मुलांना लहानपणापासून वाहतूक नियमांचे शिक्षण द्यावे सचिन विधाते; धुमाळवाडीत रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क ‘फळांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडीतील...

*सलग दुसऱ्या वर्षी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार मुधोजी हायस्कूलचा मुलींचा...

0
सलग दुसऱ्या वर्षी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार मुधोजी हायस्कूलचा मुलींचा हॉकी संघ; ऐतिहासिक कामगिरी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क . फलटण क्रीडा...

*तात्यांच्या ७५ वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव* *मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची...

0
तात्यांच्या ७५ वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती; सुरवडीत अभिष्टचिंतन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण सुरवडी, ता....

error: Content is protected !!