Homeताज्या बातम्याफलटण फेस्टिव्हल २०२६ मध्ये ‘होम मिनिस्टर पैठणी शो’ची रंगत; पूजा म्हेत्रे ठरल्या...

फलटण फेस्टिव्हल २०२६ मध्ये ‘होम मिनिस्टर पैठणी शो’ची रंगत; पूजा म्हेत्रे ठरल्या मानकरी! रमेश परळीकर यांच्या खुमासदार निवेदनाने महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद; संध्या गायकवाड यांना द्वितीय क्रमांकाची पैठणी.

फलटण फेस्टिव्हल २०२६ मध्ये ‘होम मिनिस्टर पैठणी शो’ची रंगत; पूजा म्हेत्रे ठरल्या मानकरी!

रमेश परळीकर यांच्या खुमासदार निवेदनाने महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद; संध्या गायकवाड यांना द्वितीय क्रमांकाची पैठणी

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

फलटण, दि. २७ ऑक्टोबर : श्री सद्गुरू प्रतिष्ठान आयोजित ‘फलटण फेस्टिव्हल २०२६’ च्या तिसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘होम मिनिस्टर पैठणी शो’ला महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकप्रिय मराठी चित्रपट अभिनेते व प्रसिद्ध निवेदक रमेश परळीकर यांच्या खुमासदार निवेदनाने संपूर्ण कार्यक्रमात रंगत आणली. विविध मनोरंजक खेळ, मजेशीर उखाणे आणि चुरशीच्या स्पर्धेमुळे महिलांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. या स्पर्धेत पूजा म्हेत्रे यांनी प्रथम क्रमांकाची पैठणी जिंकण्याचा मान मिळवला, तर संध्या गायकवाड यांनी द्वितीय क्रमांकाची पैठणी पटकावली. पहिल्या दहा स्पर्धकांना साडी भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी आणि ए. बी. ज्वेलर्सच्या संचालिका सौ. सारिका शहाणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी स्वयंसिद्धा उद्योग समूहाच्या अध्यक्षा अॅड. सौ. मधुबाला भोसले, फलटण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी भोसले, स्वयंसिद्धाच्या संचालिका सौ. मृणालिनी भोसले, सौ. राजस भोईटे, सौ. ऐश्वर्या नाईक निंबाळकर, सौ. मयुरा गांधी, नगरसेविका सौ. रुपाली सस्ते, सौ. सुपर्णा आहिवळे, सौ. अनुराधा गोडसे, सौ. स्वाती फुले आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या.

या विशेष ‘होम मिनिस्टर पैठणी शो’चे सूत्रसंचालन लोकप्रिय मराठी चित्रपट अभिनेते आणि प्रसिद्ध निवेदक रमेश परळीकर यांनी आपल्या खास विनोदी, दिलखुलास आणि दणकेबाज शैलीत केले. त्यांच्या मिश्किल टिप्पणी, विनोद आणि उत्स्फूर्त संवादामुळे कार्यक्रमस्थळी हास्याचे फवारे उडाले. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थित महिला भगिनींचा उत्साह अधिकच वाढला.

कार्यक्रमादरम्यान ‘तळ्यात-मळ्यात’, ‘फास्ट फिंगर’, झटपट उत्तरे आणि मजेशीर उखाणे अशा विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांमध्ये सहभागी होताना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक फेरीत रंगणारी चुरस, स्पर्धकांचा उत्साह आणि पैठणी जिंकण्याची उत्कंठा यामुळे कार्यक्रमात सातत्याने रंगत निर्माण झाली.

पैठणी जिंकण्याच्या उत्साहात मोठ्या संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. केवळ मनोरंजनच नव्हे, तर महिलांना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची आणि एकत्र येऊन आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून मिळाली. महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण बनले होते.

श्री सद्गुरू प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘फलटण फेस्टिव्हल २०२६’ मधील या विशेष कार्यक्रमाने महिलांच्या मनोरंजनाला एक वेगळीच उंची दिली. पूजा म्हेत्रे यांच्या पैठणी विजयासह आणि रमेश परळीकर यांच्या खुमासदार निवेदनाने हा ‘होम मिनिस्टर पैठणी शो’ महोत्सवातील एक आकर्षक सोहळा ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फलटणमध्ये निकृष्ट दर्जाच्या खव्याप्रकरणी बालाजी स्वीट्स व गनबोटे मिल्क प्रॉडक्ट्सला दीड लाखांचा दंड ...

0
फलटणमध्ये निकृष्ट दर्जाच्या खव्याप्रकरणी बालाजी स्वीट्स व गनबोटे मिल्क प्रॉडक्ट्सला दीड लाखांचा दंड अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी न्यायनिर्णय अधिकाऱ्यांचा आदेश; विक्रेता व उत्पादकावर...

फलटणमध्ये निकृष्ट दर्जाच्या खव्याप्रकरणी बालाजी स्वीट्स व गनबोटे मिल्क प्रॉडक्ट्सला दीड लाखांचा दंड ...

0
फलटणमध्ये निकृष्ट दर्जाच्या खव्याप्रकरणी बालाजी स्वीट्स व गनबोटे मिल्क प्रॉडक्ट्सला दीड लाखांचा दंड समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी न्यायनिर्णय...

*फलटण फेस्टिव्हल २०२६ : ग्रुप डान्स स्पर्धेत साताऱ्याच्या आकाश कला केंद्राचा डंका!*

0
फलटण फेस्टिव्हल २०२६ : ग्रुप डान्स स्पर्धेत साताऱ्याच्या आकाश कला केंद्राचा डंका!   नृत्यकलेच्या बहारदार आविष्काराने फलटणकर मंत्रमुग्ध; नृत्य कला अकॅडमी फलटण द्वितीय, तर अल्फा ग्रुपचा...

गोखळी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी योगेश तानाजी गावडे पाटील यांची निवड.

0
गोखळी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी योगेश तानाजी गावडे पाटील यांची निवड. प्रतिनिधी. सुमित काळे फलटण पूर्व भागातील शंभर वर्ष परंपरा असलेली सहकारातील गोखळी विविध कार्यकारी...

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे गौरवोद्गार; श्री सद्गुरू प्रतिष्ठानच्या फलटण फेस्टिव्हल २०२६ चा...

0
शहराचा पुसट झालेला सांस्कृतिक वारसा गडद करण्याचे काम फलटण फेस्टिव्हलच्या माध्यमातून सुरू! माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे गौरवोद्गार; श्री सद्गुरू प्रतिष्ठानच्या फलटण फेस्टिव्हल २०२६...

error: Content is protected !!