सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा मुधोजी महाविद्यालयातर्फे सत्कार!
प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन; पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सातारा यांच्या संचालकपदी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल मुधोजी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पंढरीनाथ कदम यांच्या हस्ते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे लोकविकासाची जाण असलेले, संयमी, पुरोगामी विचारांचे आणि धडाडीचे नेतृत्व म्हणून परिचित आहेत. सहकार व बँकिंग क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव तसेच समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांची असलेली जाण ही त्यांची जमेची बाजू आहे. ते श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लिमिटेड, फलटणचे चेअरमन असून फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी म्हणूनही कार्यरत आहेत. यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी विकासाची विविध महत्त्वपूर्ण कामे केली आहेत.
सर्वसामान्य जनतेचा विश्वास, सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि लोकविकासाचा ध्यास या बळावर त्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या निवडीमुळे सहकार क्षेत्रात त्यांच्याकडून अधिक प्रभावी कार्य घडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या सत्कारप्रसंगी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. आर. वाय. गायकवाड, मराठी विभागप्रमुख प्रो. डॉ. प्रभाकर पवार, प्रो. डॉ. अशोक शिंदे तसेच वरिष्ठ लिपिक श्री. दिलीप कुमरे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.


























