श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या उद्यानकन्यांचे सांगवी येथे स्वागत
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क
फलटण – फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील विद्यार्थिनींचे प्रशिक्षणासाठी सांगवी ता .फलटण जि. सातारा येथे दाखल झाले असून गावातील ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सुमारे 20 आठवडे येथे वास्तव्यात राहून शेती विषयक माहिती नवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती देऊन गावामध्ये शेती विषयक विविध उपक्रम व कार्यक्रम राबविणार आहेत माती परीक्षण ,फळबाग लागवड ,बीज प्रक्रिया, आधुनिक शेती अवजारे ,रोजगार शेतीचा आर्थिक फायदा, जनावरांचे लसीकरण आदीबाबत उपस्थित गावकरी व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. उद्यानविद्या विषयक जनजागृती करण्यास उद्यानविद्या कार्यानुभव यांचा अभ्यास उद्यानकन्या करणार आहेत कु. कोमल हाके कु. सानिया शिंदे कु.मुस्कान शेख कु. साक्षी चौधरी कु. राजेश्री सपकाळ कु. सई दुरगुडे या उद्यानकन्या सांगवी ता. फलटण येथे दाखल झाल्या आहेत त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सर्व ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केले त्यावेळी युवा नेते अधीनाथ गायकवाड व मा. सरपंच श्री संतोष मोरे सहाय्यक कृषी अधिकारी सौ गावडे मॅडम तलाठी योगेश अडलिंगे व ग्रामसेवक श्री भरत भोसले ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते . उद्यानविद्या महाविद्यालयाची प्राचार्य डॉ एस.डी निंबाळकर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ यु .डी चव्हाण कार्यक्रम समन्वयक प्रा ए .डी पाटील कार्यक्रम अधिकारी डॉ जे . व्ही लेंभे आणि डॉ पि .एस खरात यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले


























