फलटण दि.१७| मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर मध्ये ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. सकाळी आठ वाजता फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर फलटण च्या चेअरमन मा. सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर व मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते तिरंगा झेंडा फडकवण्यात आला. यावेळी झेंड्याला सलामी देऊन राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्य गीत म्हटले व संविधानाचे वाचन करण्यात आले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे संचालन करून तिरंगी झेंड्याला सलामी दिली. यानंतर मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर व नवीन प्राथमिक विद्या मंदिर मधील गुणी कलाकारांनी विविध कला सादर करून दाखवल्या तसेच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या750 व्या जयंतीनिमित्त पालखी सोहळा साजरा झाला व सर्वांनी पसायदान म्हटले या कार्यक्रमास निमंत्रित सदस्या श्रीमती निर्मला सतीश रणवरे व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रुपेश शिंदे सर , नवीन प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. शेख मॅडम, मुधोजी बालक मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ. रजपूत मॅडम , नवीन बालक मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ. साबळे मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी हजर होते.




















