Homeताज्या बातम्याशेतकऱ्यांना मोबदला न देता महामार्गाचे काम सुरू; लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...

शेतकऱ्यांना मोबदला न देता महामार्गाचे काम सुरू; लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भेटणार – आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

सातारा दि.२९| फलटण–दहिवडी मार्गावरील अहमदनगर–फलटण–सांगली राष्ट्रीय महामार्ग (क्र. 160) चे काम शेतकऱ्यांना योग्य मोबदला न देता सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भेटून न्याय मिळवून देण्याचा शब्द त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

कोळकी ते दुधेबावी या मार्गावरील गावातील शेतकरी मागील काही दिवसांपासून रस्त्याच्या कामाबाबत अस्वस्थ आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीवर अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण न करता आणि योग्य मोबदला न देता संबंधित विभागाने रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या शेतकऱ्यांनी नुकतेच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊ, असा शब्द रामराजेंनी त्या वेळी शेतकऱ्यांना दिला होता.

त्याच अनुषंगाने आज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सातारा या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह भेट दिली. यावेळी बाधित शेतकऱ्यांनी आपले प्रश्न व अडचणी सविस्तर मांडल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आवश्यक ती माहिती घेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी बोलताना आमदार श्रीमंत रामराजे म्हणाले, “राष्ट्रीय महामार्गाचे काम महत्त्वाचे असले तरी त्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता काम सुरू करणे हा अन्याय आहे. याबाबत मी लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भेटून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.”

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर तोडगा निघावा, यासाठी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुढाकार घेतल्याने शेतकरी समाधानी झाले असून आता सर्वांचे लक्ष आगामी मंत्र्यांच्या बैठकीकडे लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्राची गणना आजपासून सुरू होत असताना नागरिकांना उत्तर देण्यासाठी 33 प्रश्न

डॉ निरुपमा जे डांगे | भारत सरकारचे सहसचिव आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी" decoding="async" fetchpriority="high"/>डॉ निरुपमा ज डांगे | भारत सरकारचे सहसचिव...

*एका बाजूला “पर्यावरण वाचवा”चे संदेश दिले जात असताना दुसऱ्या बाजूला वाढलेली झाडे तोडली जात...

फलटण वनखात्याकडून अक्षम्य चूक समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. शहरातील विमानतळ शेजारील वन विभागाच्या जागेत असलेल्या झाडांची अचानक तोड झाल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली...

*फलटण तालुक्यात मळीची अवैध वाहतूक सुरुच महसूलाला कोट्यावधींचा फटका कारवाईची मागणी तीव्र*

फलटण तालुक्यात मळीची अवैध वाहतूक सुरूच; महसूलाला कोट्यवधींचा फटका, कारवाईची मागणी तीव्र   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : फलटण तालुक्यात विनापरवाना मळीची अवैध वाहतूक...

ISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतात

यावर्षी ICSE परीक्षेत महाराष्ट्रातील मुलांनी मुलींच्या 99.93% उत्तीर्णतेशी बरोबरी केली, ही एक महत्त्वपूर्ण बदल आहे. मुलींनी ISC निकालांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली असताना,...

रु. किमतीचे 3 किलो हायड्रोपोनिक तण. पुणे विमानतळावर 2 फ्लायर्सकडून 1.17 कोटी जप्त

कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण ३३४८ ग्रॅम हाय एंड वीड जप्त करण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे रु. अवैध बाजारात 1.17 कोटी." decoding="async" fetchpriority="high"/>सीमाशुल्क...

error: Content is protected !!