Homeताज्या बातम्यामल्हारपेठ पोलिसांची मोठी कामगिरी – ५ लाख ९ हजारांचा मुद्देमाल मालकांच्या ताब्यात

मल्हारपेठ पोलिसांची मोठी कामगिरी – ५ लाख ९ हजारांचा मुद्देमाल मालकांच्या ताब्यात

सातारा, दि. १३ : मल्हारपेठ पोलिसांनी चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल फोन शोधून त्यांचा मुद्देमाल मालकांना परत दिला आहे. एकूण ५ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मल्हारपेठ पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक ०४/२०२४ व ९५/२०२५ या गुन्ह्यांतील ३ लाख ३५ हजार रुपये किंमतीचे १०.२५ तोळे सोन्याचे दागिने स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासातून मिळवण्यात आले. पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला.

दरम्यान, हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मछले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमण्यात आले होते. सीईआयआर पोर्टल आणि तांत्रिक माहितीच्या आधारे सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे पोलिसांना १ लाख ७४ हजार रुपये किंमतीचे १० मोबाईल फोन शोधून काढता आले.

सोन्याचे दागिने व मोबाईल असे एकूण ५ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मछले यांनी मालकांच्या ताब्यात दिला. मुद्देमाल परत मिळाल्यानंतर तक्रारदारांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच मल्हारपेठ पोलिसांचे आभार मानले.

या कामगिरीत सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मछले, पोलिस उपनिरीक्षक रामराव वेताळ, एपीआय अंकुशी, पो.हवा. पगडे, सारुख, सचिन पाटील, शिपाई सिध्दनाथ शेडगे, अमोल पवार, अमोल पिसे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे शिपाई महेश पवार यांनी सहभाग घेतला.

या उल्लेखनीय कारवाईबद्दल सर्व अधिकारी व अंमलदारांचे कौतुक पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर व उपविभागीय पोलिस अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; पालखी सोहळ्याच्या तयारीसह विकासकामांना गती*

फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; पालखी सोहळ्याच्या तयारीसह विकासकामांना गती     फलटण प्रतिनिधी | ३० जून २०२६ समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण नगर...

*पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर* *प्रशासनाला प्रसारमाध्यमांची एलर्जी* ?

पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर प्रशासनाला प्रसारमाध्यमांची एलर्जी ? फलटण प्रतिनिधी | ३० जून २०२६ समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी...

‘सियाचे अफेअर आहे का?’ : केतन अग्रवालने मंगेतरच्या चेतन चौधरीशी संबंध असल्याबद्दल शंका उपस्थित...

अहवालात असे सूचित होते की केतनने बेवफाईबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि प्राणघातक घटनेपूर्वी सियाच्या कृतीमुळे तो अस्वस्थ झाला होता. पुणे: पुण्यातील रिअल्टर...

नसरापूर बलात्कार-हत्येच्या दोषीला फाशीची शिक्षा; न्याय मिळाला असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या प्रकरणात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू पुणे - विशेष जलदगती न्यायालयाने सोमवारी (६५) दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्याने नसरापूर बलात्कार-हत्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या...

*वैखरीचा राजा, कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले : विचारांचा तेजस्वी दीपस्तंभ* *मा. नायब तहसीलदार ....

वैखरीचा राजा, कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले : विचारांचा तेजस्वी दीपस्तंभ मा. नायब तहसीलदार . नंदकुमार भोईटे समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क महाराष्ट्राच्या वैचारिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विश्वात...

error: Content is protected !!