Homeताज्या बातम्याफलटण शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई दोन ट्रॅक्टर व पोकलैंड...

फलटण शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई दोन ट्रॅक्टर व पोकलैंड जप्त; आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

फलटण, दि. १६ सप्टेंबर २०२५ | शेतकऱ्यांची फसवणूक करून तब्बल ६५ लाख रुपयांचा मुद्देमाल परदेशी विक्रीसाठी नेणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात फलटण शहर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत दोन ट्रॅक्टर आणि एक पोकलैंड मशिन जप्त करण्यात आले असून, कर्नाटकातील दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील शेतकरी विनय संपत माने यांनी फेसबुकवर ट्रॅक्टर भाड्याने देण्याची जाहिरात केली होती. त्यावर कर्नाटकातील मुस्ताक मोहम्मद हुसेन याने राष्ट्रीय महामार्गाचे सरकारी काम असल्याचे भासवून दोन ट्रॅक्टर आणि एक पोकलैंड भाड्याने घेतले. करारानुसार भाडे न देता संशयिताने मोबाईल बंद केला आणि खोटी वर्क ऑर्डर दाखवून ही यंत्रसामग्री कर्नाटकमध्ये नेऊन विक्रीस काढली.

शेतकऱ्याने तक्रार दाखल करताच पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. महाराष्ट्र, कर्नाटक आणि मुंबईपर्यंत शोधमोहीम राबवून अखेर आरोपी मुस्ताक मोहम्मद हुसेन याला मुंबईतून, तर साथीदार इदमा हबीब रेहमान कुंजी बिहारी याला कर्नाटकातून अटक करण्यात आली. तपासात ही टोळी खोट्या सरकारी वर्क ऑर्डर दाखवून शेतकऱ्यांची यंत्रसामग्री बेकायदेशीररित्या विकत असल्याचे उघड झाले.

या कारवाईत जॉन डिअर कंपनीचे दोन ट्रॅक्टर व ल्यूगॉन्ग कंपनीचे पोकलैंड असा ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, पो.उ.नि. विजयमाला गाजरे, सहाय्यक पो.उ.नि. संतोष कदम, अंमलदार पूनम बोबडे, काकासो कर्णे, अतुल बडे व जितेंद्र टिके यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

0
पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

0
पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

एकाच वेळी दोन ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग बाधकांमुळे टेक्नी 20L पेक्षा जास्त गमावतो

0
पुणे: डेक्कन येथील सॉफ्टवेअर इंजिनीअर (२५) यांना गेल्या वर्षी जून ते फेब्रुवारीदरम्यान दोन ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणुकीत 20 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले.तंत्रज्ञ...

रात्रीचे तापमान वाढल्याने उष्माघाताचा धोका वाढतो: डॉक्स

0
पुणे: संपूर्ण शहरात कमाल तापमान ३९-४१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहून उष्माघातासह उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढत असताना रात्रीचे वाढते तापमान ही गंभीर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय

0
पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

error: Content is protected !!