Homeताज्या बातम्यामुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान - माण-खटाव तालुकास्तरीय कार्यशाळेचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री...

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान – माण-खटाव तालुकास्तरीय कार्यशाळेचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थित गोंदवले येथे संपन्न

सातारा दि.22- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गाव-खेड्यांचा विकास सुरू असून ग्रामस्थांनी देखील याबाबत पुढाकार घेतला पाहिजे. हे अभियान म्हणजे ग्रामविकासाची चळवळ आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत येत्या १०० दिवसात विकासाची मोठी चळवळ संपूर्ण राज्यात उभी राहील, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

गोंदवले बुद्रुक येथील शेतकरी भवन कार्यालय येथे आज ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माणच्या उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर, माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, पंचायत समिती खटाव (वडूज) गटविकास अधिकारी योगेश कदम यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

गावच्या विकासासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी व ग्रामविकास अधिकारी यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे असे सांगून मंत्री श्री. गोरे म्हणाले, प्रत्येक गाव सर्वार्थाने समृद्ध होण्यासाठी, केंद्र आणि राज्याच्या सर्व योजनांची १०० टक्के अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासाठी योजनांची अमंलबजावणी करणाऱ्या लोकप्रतिनिधींसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन योगदान देणे गरजेचे आहे. शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी केली तर गावची कामे यशस्वीरित्या मार्गी लागतील. राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याकरिता तालुका जिल्हा महसूल विभाग व राज्यस्तरावर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभिमान राबवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.येत्या 100 दिवसांत मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान मोठी चळवळ म्हणून उभी राहील असे काम करा, असे आवाहनही श्री. गोरे यांनी केले.

या कार्यशाळेत पंतप्रधान घरकुल आवास योजना टप्पा २ अंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना तुकडेबंदी कायद्यांतर्ग खटाव तालुक्यातील १८ माण तालुक्यातील ५ लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध करुन दिली आहे, त्याचे पत्र ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले. तसेच ३५ दिवसाच्या विक्रमी कालावधीत घरकुल पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा सत्कार मंत्री गोरे यांनी केला.प्रारंभी संत गाडगेबाबा महाराज, संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तज्ञांनी प्रोबायोटिक्स, आतड्यांवरील उपचारांचा विज्ञान-आधारित वापर करण्याचे आवाहन केले आहे

किण्वन आणि मायक्रोबायोम थेरप्यूटिक्स कॉन्फरन्समधील उपस्थित पुणे : आरोग्यसेवेचे भवितव्य केवळ रोगावर उपचार करण्यामध्ये नाही तर मानवी आतड्यांसंबंधीच्या परिसंस्थेचे सखोल ज्ञान आणि प्रोबायोटिक्सच्या...

लोहगड किल्ला हत्याकांड: केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर ‘प्रेमी’ सिया गोयल-चेतन चौधरी आता एकमेकांकडे बोटे दाखवत...

केतन अग्रवाल (आर), सिया गोयल (सी), चेतन चौधरी (एल) पुणे: पुण्याचे रिअल इस्टेट संचालक केतन अग्रवाल यांना लोहगड किल्ल्यावरून कथितरित्या त्याच्या मृत्यूस ढकलल्यानंतर,...

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

प्रेयसीच्या इशाऱ्यावरून आरोपी चौधरीने लोहगड किल्ल्यावर रियाल्टरला ढकलून दिले.

पुणे : अग्रवाल यांची मंगेतर सिया गोयल हिच्यासोबत रचलेल्या योजनेनुसार 18 जून रोजी आरोपी चेतन चौधरी याने रिअल इस्टेट फर्मचे संचालक केतन...

पावसामुळे वीज खंडित आणि चढ-उतार होतात

पावसामुळे शहरातील अनेक भागात अधूनमधून वीजपुरवठा खंडित झाला पुणे : बुधवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोंढव्यात सुमारे चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित...

error: Content is protected !!