Homeताज्या बातम्यादुष्काळी परिस्थितीत टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही – आमदार...

दुष्काळी परिस्थितीत टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही – आमदार सचिन पाटील फलटण तालुक्यातील १८ पाणी साठवण योजनांचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

दुष्काळी परिस्थितीत टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही – आमदार सचिन पाटील

फलटण तालुक्यातील १८ पाणी साठवण योजनांचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

फलटण : अल निनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनाने फलटण तालुका दुष्काळग्रस्त घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तालुक्यातील कोणत्याही गावाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू दिले जाणार नाही, अशी ग्वाही आमदार सचिन पाटील यांनी दिली.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) उपविभाग, फलटण अंतर्गत तालुक्यातील १८ पाणी साठवण योजनांच्या कामांची तसेच उपलब्ध पाणीसाठ्याची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. दुष्काळी परिस्थितीत ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा गावांना या साठवण तलावांमधून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनावर यावेळी विशेष भर देण्यात आला.

या पाहणीदरम्यान विडणी, निंबलक, पिंप्रद, राजाळे, सोमंथळी, गिरवी, धुळदेव आणि वाठार निंबाळकर येथील पाणी साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले असल्याचे निदर्शनास आले. मात्र, सोनगाव आणि सरडे येथील साठवण तलावांना अद्याप विद्युतपुरवठा जोडण्यात आलेला नसल्याने ते पूर्णपणे रिकामे असल्याचे आढळले. तसेच शिंदेवाडी येथील साठवण तलावाच्या कामात विद्युत रोहित्र स्थलांतरित करण्याचे काम प्रलंबित असल्याचेही समोर आले.

या प्रलंबित कामांची दखल घेत आमदार सचिन पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सोनगाव, सरडे आणि शिंदेवाडी येथील कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ही कामे वेळेत पूर्ण झाल्यास नीरा उजवा कालव्याचे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन उपलब्ध झाल्यानंतर संबंधित साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, होळ-खामगाव, निंभोरे, सस्तेवाडी आणि ठाकूरकी-फरांदवाडी येथील पाणी साठवण तलावांची कामे प्रगतिपथावर आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून योजना कार्यान्वित करण्याच्या सूचना आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास या साठवण तलावांमधून टँकरद्वारे संबंधित गावांना पाणीपुरवठा करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे, प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत आणि तालुक्यातील कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश आमदार सचिन पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या पाहणी दौऱ्यावेळी संबंधित लाभक्षेत्रांतील नागरिक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दुष्काळी परिस्थितीत टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही – आमदार सचिन पाटील...

0
दुष्काळी परिस्थितीत टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही – आमदार सचिन पाटील फलटण तालुक्यातील १८ पाणी साठवण योजनांचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण...

बारामतीकरांनो, पाण्याचा जपून वापर करा! नीरा डावा कालव्याचा प्रवाह बंद; शहरात दोन दिवस पाणीपुरवठा...

0
बारामतीकरांनो, पाण्याचा जपून वापर करा! नीरा डावा कालव्याचा प्रवाह बंद; शहरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण रविवार, १८ ऑक्टोबरला बारामती शहरासह...

फलटण नगरपरिषदेच्या सफाई कामगार महिलांकडून माळजाई मंदिरात उत्साहात महाआरती आणि महाप्रसाद

0
फलटण नगरपरिषदेच्या सफाई कामगार महिलांकडून माळजाई मंदिरात उत्साहात महाआरती आणि महाप्रसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण नगरपरिषदेच्या सर्व महिला सफाई कामगारांनी श्री माळजाई मंदिर परिसर...

कर्जदारांच्या वेदना कोण समजून घेणार? आर्थिक संकटग्रस्त कुटुंबांना न्यायाची प्रतीक्षा!

0
कायदेशीर हक्क, प्रक्रिया, कागदपत्रांची सत्यता आणि सक्षम प्राधिकरणाचे आदेश यांचे पालन झाले पाहिजेत. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण " लाखो रुपयांच्या कर्जासाठी कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेची लूट...

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात मंगळवारी भरलेल्या लिलावात कांद्याच्या दरात जोरदार...

0
फलटण कृषी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात मंगळवारी भरलेल्या लिलावात कांद्याच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळाली. बाजारात १५१४ पिशव्यांची म्हणजेच...

error: Content is protected !!