मुधोजी महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ निमित्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण
फ. ए. सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग व विवेकवाहिनी आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त ‘वाचन प्रेरणा दिन – २०२६’ चे औचित्य साधून विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता मुधोजी महाविद्यालयातील प्राचार्य शिवाजीराव भोसले सभागृहात पार पडणार आहे.
कार्यक्रम तपशील:
प्रमुख पाहुण्या व वक्त्या: प्रा. डॉ. सीता जगताप
अध्यक्ष: प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम
समन्वयक: प्रा. डॉ. प्रभाकर पवार व प्रा. डॉ. अशोक शिंदे
सहसंयोजक: प्रा. शैला क्षीरसागर व डॉ. गौरी गायकवाड
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्यातून आणि विचारांतून विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुधोजी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


























