Homeताज्या बातम्याबारामतीकरांनो, पाण्याचा जपून वापर करा! नीरा डावा कालव्याचा प्रवाह बंद; शहरात दोन...

बारामतीकरांनो, पाण्याचा जपून वापर करा! नीरा डावा कालव्याचा प्रवाह बंद; शहरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार रविवार, १८ ऑक्टोबरला बारामती शहरासह ग्रामीण भागात पाणीपुरवठा बंद; सोमवार, १९ ऑक्टोबरला फलटणसह काही भागांत पाणीपुरवठा बंद

बारामतीकरांनो, पाण्याचा जपून वापर करा! नीरा डावा कालव्याचा प्रवाह बंद; शहरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण

रविवार, १८ ऑक्टोबरला बारामती शहरासह ग्रामीण भागात पाणीपुरवठा बंद; सोमवार, १९ ऑक्टोबरला फलटणसह काही भागांत पाणीपुरवठा बंद

बारामती : नीरा डावा कालव्यामधील पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने आणि उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने बारामती नगरपरिषदेने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी बारामती शहरातील अनेक भागांसह रुई व बारामती ग्रामीण परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. तसेच सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी फलटण रोड परिसरासह काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती बारामती नगरपरिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

नीरा डावा कालव्याचा प्रवाह बंद झाल्याने पाण्याची उपलब्धता मर्यादित झाली आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रविवार, १८ ऑक्टोबरला या भागांत पाणीपुरवठा बंद

रविवारी म्हाडा कॉलनी, मुजावर वाडा, देवळे इस्टेट, पानगल्ली, समर्थनगर, आमराई, सिद्धार्थनगर, विठ्ठलनगर, सुभाषनगर, चंद्रमणीनगर, वडार सोसायटी, कोअर हाऊस इंदापूर रोड, एस.टी. स्टँड परिसर, सटवाजीनगर, जवाहरनगर, पोस्ट रोड, हंबीर बोळ, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, सिनेमा रोड, विजयनगर, साईगणेशनगर, आकांक्षित सोसायटी, अशोकनगर, आनंदनगर, मयुरेश्वर अपार्टमेंट, भिगवण रोड, वसंतनगर, अवधूतनगर, व्हील कॉलनी, तपोवन कॉलनी, विवेकानंदनगर, महादेव मळा, सद्गुरुनगर, मेढर रोड, श्रावण गल्ली, तांदुळवाडी बेस चौक, सिद्धेश्वर गल्ली, मारवाड महावीर पथ, बुरुड गल्ली, नेवसे रोड, सुभाष चौक, कसबा गल्ली, कचेरी रोड, बयाजीनगर, गावटाण, साईनगर, ग्रीन पार्क तसेच संपूर्ण रुई भागात पाणीपुरवठा होणार नाही.

सोमवार, १९ ऑक्टोबरला या भागांत पाणीपुरवठा बंद

सोमवारी संपूर्ण कसबा फलटण रोड, रेणुकानगर, मुल्ला वस्ती, शिक्षक सोसायटी, लक्ष्मीनारायण नगर, माळेगाव रोड, हनुमाननगर, माळेगाव कॉलनी, सातव वस्ती, शिवाजी नगर, जामदार रोड, कारभारी नगर, सावतमाळीनगर, श्रीरामनगर, चांदणी चौक, पंचशील नगर, साठेनगर, जगताप मळा, जुना मोरगाव रोड, खंडोबानगर, नवीन मोरगाव रोड, बयाजीनगर, गावटाण, साईनगर, ग्रीन पार्क तसेच संपूर्ण रुई भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन

नीरा डावा कालव्यामधील पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरू होईपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू राहण्याची शक्यता असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिल भुसे यांनी केले आहे.

पाण्याची टंचाई लक्षात घेता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि पाणी बचतीला प्राधान्य द्यावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फलटण नगरपरिषदेच्या सफाई कामगार महिलांकडून माळजाई मंदिरात उत्साहात महाआरती आणि महाप्रसाद

0
फलटण नगरपरिषदेच्या सफाई कामगार महिलांकडून माळजाई मंदिरात उत्साहात महाआरती आणि महाप्रसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण नगरपरिषदेच्या सर्व महिला सफाई कामगारांनी श्री माळजाई मंदिर परिसर...

कर्जदारांच्या वेदना कोण समजून घेणार? आर्थिक संकटग्रस्त कुटुंबांना न्यायाची प्रतीक्षा!

0
कायदेशीर हक्क, प्रक्रिया, कागदपत्रांची सत्यता आणि सक्षम प्राधिकरणाचे आदेश यांचे पालन झाले पाहिजेत. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण " लाखो रुपयांच्या कर्जासाठी कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेची लूट...

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात मंगळवारी भरलेल्या लिलावात कांद्याच्या दरात जोरदार...

0
फलटण कृषी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात मंगळवारी भरलेल्या लिलावात कांद्याच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळाली. बाजारात १५१४ पिशव्यांची म्हणजेच...

मुधोजी महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ निमित्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन फलटण:

0
मुधोजी महाविद्यालयात 'वाचन प्रेरणा दिन' निमित्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फ. ए. सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग...

🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर...

0
🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचा स्तुत्य उपक्रम; सर्पदंश व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत...

error: Content is protected !!