Homeताज्या बातम्या“दर रविवारी - चला बुद्धविहारी, आपले संविधान - आपले अधिकार” अभियानांतर्गत राजाळे...

“दर रविवारी – चला बुद्धविहारी, आपले संविधान – आपले अधिकार” अभियानांतर्गत राजाळे येथे सूत्र पठन व संविधान जन जागृती

फलटण(राजाळे) दि.१०| भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने “दर रविवारी – चला बुद्धविहारी” आणि “आपले संविधान, आपले अधिकार” या अंतर्गत सूत्र पठाण व संविधान जनजागृती अभियानांतर्गत राजाळे येथे राबवण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे धम्म विचारांद्वारे समाजात बंधुभाव, समता आणि न्यायाची जाणीव निर्माण करणे तसेच भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांची जाणीव जनमानसात पोहोचवणे हा आहे. सुरुवातीला राजाळे परिसरात मंगल मैत्रीची फेरी काढण्यात आली. फेरीमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, उपासक – उपासिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. फेरी दरम्यान सर्वांविषयी मंगल मैत्रीची भावना व्यक्त केली. त्याचप्रमाणे त्रिसरणाच्या मंगलमय सुरामध्ये ही फेरी पार पडली. “धम्म आणि संविधान” या दोन आधारस्तंभांच्या माध्यमातून समाजात मंगल मैत्री, जागरूक नागरिकत्व आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. यानंतर बुद्धविहारात सूत्र पठण करण्यात आले. उपासक – उपासिकांनी भारतीय संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्याचे रक्षण आणि संवर्धन करण्याची प्रतिज्ञा घेतली.

या वेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयुष्यमान महावीर भालेराव सर, महासचिव आयु. बाबासाहेब जगताप सर. कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर, ज्येष्ठ मार्गदर्शक सोमीनाथ घोरपडे सर, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते सर, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे सर, संघटक विजयकुमार जगताप सर, समता सैनिक दलाचे तालुका उपाध्यक्ष संपत भोसले सर, विविध विकास कार्यकारी सोसायटी चे व्हाईस चेअरमन विलास भालेराव, उपासक रोहीदास भंडारे, बौद्धाचार्य प्रशांत भालेराव, संबुद्ध, आदित्य महेश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना सूत्रपठनाची पुस्तक भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा फलटण च्या वतीने देण्यात आली.

“भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्र व राज्यस्तरीय २५ कलमी कार्यक्रमांतर्गत धम्मप्रसार, शिक्षण, महिला सबलीकरण आणि संविधान जनजागृती हे प्रमुख उद्दिष्ट आहे. संपूर्ण तालुक्यात ५६ ग्राम शाखा स्थापन करून हे अभियान सातत्याने राबविण्यात येत आहे.” यावेळी बोलताना तालुका शाखेचे प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयुष्यमान रामचंद्र मोरे म्हणाले,” डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेला धम्माचा मार्ग आणि भारतीय संविधान याचे जर आपल्याला रक्षण करायचं असेल तर सर्वांनी दर रविवारी बुद्ध विहारात येऊन विचार मंथन केलं पाहिजे. तर आणि तरच धम्म आणि संविधान वाचणार आहे. तेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन त्याचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या संकल्प करूया.” यावेळी बोलताना फलटण तालुका शाखेचे कार्यालय सचिव चंद्रकांत मोहिते म्हणाले,” आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी मनात मंगल मैत्रीची भावना व्यक्त करून सर्वांनी एकत्र येऊन केंद्राने दिलेल्या पंचवीस कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबवूया. फलटण तालुक्यात तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आयुष्यमान महावीर भालेराव व त्यांच्या नेतृत्वात काम करणारे आपण सर्व पदाधिकारी जे काम करत आहोत ते काम इतरही तालुक्यात पोहोचत आहे.” यावेळी तालुक्याचे जेष्ठ मार्गदर्शक सोमीनाथ घोरपडे सर यांनी केंद्राने दिलेला 22 कलमी कार्यक्रम अतिशय प्रभावीपणे राबवून जिल्हा पुढे आदर्श निर्माण करण्यासाठी सर्वांनी अंग झाडून काम करण्याविषयीची भावना व्यक्त केली. प्रस्थापित व्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाप्रती चुकीच्या पद्धतीने मांडणी करत असताना आपण बाबासाहेबांचे वारसदार म्हणून त्याचे सत्य संशोधन करून मांडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सचिव आयुष्यमान बाबासाहेब जगताप सर यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील नवीन कार्यालयासह भारतातील 500 अभियंत्यांपर्यंत कर्मचारी संख्या वाढवण्याचे जॅमकोचे उद्दिष्ट आहे

केट शेफर, कार्यकारी अध्यक्ष आणि सीईओ, जॅमको इंटिरियर्स (उजवीकडे); संजीव सेन, मुख्य कार्यकारी अधिकारी (मध्य), जॅमको इंटिरिअर्स, नीलेश बोराडे, कंट्री हेड इंडिया, जॅमको...

*फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; पालखी सोहळ्याच्या तयारीसह विकासकामांना गती*

फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; पालखी सोहळ्याच्या तयारीसह विकासकामांना गती     फलटण प्रतिनिधी | ३० जून २०२६ समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण नगर...

*पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर* *प्रशासनाला प्रसारमाध्यमांची एलर्जी* ?

पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर प्रशासनाला प्रसारमाध्यमांची एलर्जी ? फलटण प्रतिनिधी | ३० जून २०२६ समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी...

‘सियाचे अफेअर आहे का?’ : केतन अग्रवालने मंगेतरच्या चेतन चौधरीशी संबंध असल्याबद्दल शंका उपस्थित...

अहवालात असे सूचित होते की केतनने बेवफाईबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि प्राणघातक घटनेपूर्वी सियाच्या कृतीमुळे तो अस्वस्थ झाला होता. पुणे: पुण्यातील रिअल्टर...

नसरापूर बलात्कार-हत्येच्या दोषीला फाशीची शिक्षा; न्याय मिळाला असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या प्रकरणात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू पुणे - विशेष जलदगती न्यायालयाने सोमवारी (६५) दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्याने नसरापूर बलात्कार-हत्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या...

error: Content is protected !!