Homeताज्या बातम्यानगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा मॉर्निंग वॉक दरम्यान नागरिकांशी संवाद

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा मॉर्निंग वॉक दरम्यान नागरिकांशी संवाद

प्रतिनिधी जुबेर कोतवाल

फलटण दि.२८|  एकीकडे फलटण नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून निवडणुकीत उभे असणारे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार विविध प्रकारे प्रचार करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सकाळी ६ वाजता विमानतळ परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी विविध विषयावर संवाद साधला.

सकाळी विमानतळ परिसरात अचानक भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या व खेळण्यास येणाऱ्या तरुणांशी संवाद साधत त्यांना येणाऱ्या समस्येबाबत विचारपूस केली. यावेळी उपस्थित जेष्ठ नागरिकांनी व तरुणांनी समशेरसिंह यांच्यापुढे फलटणमध्ये ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी व खेळासाठी सुसज्ज असे मैदान नसल्याचे सांगितले. यावेळी समशेरसिंह यांनी निश्चितच पुढील काही दिवसात ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज बाग बगीचे व तरुणांना खेळण्यासाठी खेळाची मैदाने नगर परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

समशेरसिंह नाईक निंबाळकर हे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विविध भागात तसेच विविध स्तरातील नागरिकांशी संवाद साधत असून फलटण शहरातील नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्या व अडचणी याबाबत माहिती घेत असून येणाऱ्या काळात फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून समस्या सोडवण्यावर कसा भर देण्यात येईल याकडे लक्ष देत आहेत.

फलटण शहरात मॉर्निंग वॉक दरम्यान आज अखेर कोणत्याही राजकीय नेत्यांनी नागरिकांच्या व तरुणांच्या समस्या ऐकून घेतल्याचे कधी पाहण्यात आले नाही. परंतु समस्येची जाण असणाऱ्या समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी अचानक सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी संवाद साधत प्रचार मोहीम अधिक गतीमान केली. विमानतळ परिसरात फिरणाऱ्या नागरिकांना भेटून त्यांनी आपल्या योजना आणि विकासासाठीच्या आश्वासनांची माहिती दिली.

भाजप व राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी आरोग्य, वाहतूक व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि महिला सुरक्षेसंदर्भात मते जाणून घेतली. नागरिकांमध्ये समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची भेट झाल्याने मुद्दे थेट मांडण्याची संधी मिळाल्याचा आनंद होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शहरात पावसाची संततधार, घाट भागात जोरदार पाऊस

रविवारी झालेल्या पावसामुळे पुण्यातील कर्वे रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती पुणे : शनिवार ते रविवार सकाळी 8.30 या 24 तासांत पुणे...

पाईपलाईन चाचणीत मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने पुण्यात नव्याने बांधलेला रस्ता खराब; व्हिडिओ व्हायरल

पुणे : पुण्याजवळील तळेगाव दाभाडे येथे नव्याने बांधलेला रस्ता महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाळ्यात पाईपलाईनच्या दाब चाचणीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने खराब झाला आहे.घटनास्थळावरील व्हिडिओंमध्ये...

*ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, तहसील* *कार्यालयाशेजारी, फलटण येथे रविवार,...

फलटण | प्रतिनिधी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, तहसील कार्यालयाशेजारी, फलटण येथे रविवार, दि. ०५ जुलै...

*सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या...

प्रतिनिधी, दि. ५ : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारकास अखेर...

’17 दिवसात दोघेही आम्हाला सोडून गेले’: केतन अग्रवालच्या काकांनी रियाल्टरच्या मृत्यूनंतर आजोबांना दिलेला धक्का...

देवीचंद अग्रवाल (सी) यांच्या अंत्यसंस्कारानंतर बोलताना कुलदीप अग्रवाल (एल) म्हणाले की, 17 दिवसांच्या कालावधीत केतन आणि त्याचे आजोबा या दोघांच्याही मृत्यूमुळे कुटुंब उद्ध्वस्त...

error: Content is protected !!