Homeताज्या बातम्याकमला निंबकर बालभवनच्या विद्यार्थिनींचा विज्ञान प्रश्नमंजुषेत प्रथम क्रमांक 

कमला निंबकर बालभवनच्या विद्यार्थिनींचा विज्ञान प्रश्नमंजुषेत प्रथम क्रमांक 

फलटण: पंचायत समिती फलटण शिक्षण विभागामार्फत आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल, कोळकी येथे संपन्न झाले. या प्रदर्शनातील विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत कमला निंबकर बालभवन शाळेच्या विद्यार्थिनींनी उत्तुंग यश मिळवले.

शाळेतील इयत्ता नववीच्या वैष्णवी फुलचंद तावरे, खुशी रा. दोशी आणि इयत्ता दहावीच्या श्रेया सुरेश यादव यांनी माध्यमिक गटातून प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभाग घेतला होता. अत्यंत हुशारीने दिलेल्या उत्तरे आणि उत्कृष्ट तयारीच्या जोरावर या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या सन्मानार्थ त्यांना प्रशस्तीपत्रक, पारितोषिक आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

या विज्ञान प्रदर्शनात कमला निंबकर बालभवन शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘SMART IRRIGATION’ हे वैज्ञानिक उपकरण सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.या उपकरणात इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक आणि यांत्रिक ऊर्जा यांचा संयोजनात्मक वापर करण्यात आला आहे. उपकरणातील सेन्सर मातीतील ओलावा आणि पाण्याचे प्रमाण तपासतो आणि त्यानुसार शेती किंवा बागेला आवश्यक तेवढेच पाणी पुरवतो. यामुळे पाण्याची तसेच विजेची बचत मोठ्या प्रमाणावर होऊ शकते.

हे उपकरण तयार करण्यासाठी कॉम्प्युटर विभागाचे शिक्षक श्री. तेजस राऊत यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. या प्रकल्पात इयत्ता नववीचे रुद्र ढेंबरे आणि प्रियांका विक्रांत गांधी यांनी सहभाग घेतला.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींवर तसेच ‘SMART IRRIGATION’ उपकरण तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रश्नमंजुषेसाठी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट तयारी करून देणाऱ्या मार्गदर्शक शिक्षिका सौ. आसावरी राजेश शिंदे यांचेही विशेष कौतुक करण्यात आले.

शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. गीता बोबडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रियदर्शिनी सावंत, शिक्षण समन्वयक मधुरा राजवंशी, विशेष सल्लागार व शिक्षक विश्वास जगदाळे, तसेच सर्व शिक्षकांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; पाणी साचले, वाहतूक कोंडी शहर ठप्प; पूरग्रस्त भागातून ४९२ कुटुंबांचे...

मुसळधार पावसामुळे पुण्यात पाणी साचले आणि वाहतूक विस्कळीत झाली. पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) मान्सूनपूर्व तयारीमधील उणिवा उघड करत, मोठ्या प्रमाणावर पाणी साचणे, वाहतूक...

वायू आणि जलप्रदूषणावर एमपीसीबीने बारामती ॲग्रोला पाठवली नोटीस | पुणे बातम्या

पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) मंगळवारी राष्ट्रवादीचे (SP) आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती ॲग्रो शुगर अँड डिस्टिलरी युनिटला...

भाजप आमदार मुळशी धरणाच्या पाण्याचा शहरासाठी वापर करणार, मंत्री म्हणतात या आठवड्यात बैठक

पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाचे बॅकवॉटर पुणे : मुळशी धरणाचे पाणी पुणे शहरासाठी मिळावे, असा प्रलंबित प्रस्ताव दौंडचे भाजप आमदार राहुल कूल यांनी बुधवारी...

पुणे-मुंबई घाट विभागात भूस्खलनाने प्रभावित झालेल्या तीनपैकी एक रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यात आला

पुणे: ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल दरम्यानच्या भूस्खलनग्रस्त विभागातील तीन रेल्वे मार्गांपैकी एक मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री साफ केल्याने पुणे-मुंबई दरम्यानच्या...

पुण्यात मुसळधार पावसात इमारत कोसळून १६ जण अडकल्याची भीती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) वेस्ट-टू-एनर्जी (WTE) प्लांटमधील मोशी येथील तीन मजली प्रशासकीय इमारत बुधवारी मुसळधार पावसात कोसळलीImage Credit: TNN पुणे : पिंपरी चिंचवड...

error: Content is protected !!