बारामती |बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगता सभा मोठ्या उत्साहात पार पडली.
या भव्य सभेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन शेठ सातव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बारामती शहर व परिसरातील नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत मार्गदर्शन करताना मा. अजितदादा पवार यांनी बारामतीच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट विकास रोडमॅप मांडला. पायाभूत सुविधा, नागरी विकास, रोजगार, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रांतील आगामी योजनांची माहिती देत त्यांनी जनतेचा विश्वास अधिक दृढ केला.
या सभेत बारामतीचा विकास, जनतेचा विश्वास आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद यांचा प्रभावी संगम पाहायला मिळाला. जनतेकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि भरभरून पाठिंब्यामुळे बारामतीत पुन्हा एकदा अजितदादांच्या विकासाचे नेतृत्व निश्चित होईल, असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
सांगता सभेने निवडणूक प्रचाराचा शेवट उत्साहपूर्ण वातावरणात झाला असून, आगामी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


























