Homeताज्या बातम्याबारामती नगरपरिषद : अजित पवारांचा गड कायम, मात्र निकालातून सूचक इशारा

बारामती नगरपरिषद : अजित पवारांचा गड कायम, मात्र निकालातून सूचक इशारा

बारामती | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती नगरपरिषद निवडणुकीत अजित पवार गटाने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करत गड राखला आहे. एकूण ३५ जागांवर विजय मिळवत अजितदादा पवार गटाने स्पष्ट बहुमत मिळवले असले, तरी यंदाच्या निवडणुकीत सहा जागांवर विरोधी उमेदवार निवडून आल्याने हा निकाल पवार गटासाठी सूचक इशारा मानला जात आहे.

या निवडणुकीत नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रीय समाज पक्ष (रासपा), बहुजन समाज पार्टी (बसपा) तसेच चार अपक्ष उमेदवारांनी प्रवेश केला आहे.

नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसह भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना, बहुजन समाज पार्टी यांचे उमेदवार रिंगणात होते. एकूण ३३ नगरसेवक जागांसाठी तब्बल १५५ उमेदवारांनी निवडणूक लढवली. यापूर्वी पवार गटाचे आठ उमेदवार निवडून आले होते.

आज झालेल्या मतमोजणीनंतर विद्यमान नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यासह अजित पवार गटाचे २७ उमेदवार विजयी झाले. यामध्ये आधी निवडून आलेल्या उमेदवारांसह एकूण ३५ जागांवर अजित पवार गटाने विजय मिळवला.

दरम्यान, विरोधी गटातून निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये

रासपाचे तालुकाध्यक्ष ॲड. अमोल सातकर यांच्या पत्नी वनिता अमोल सातकर (प्रभाग ५ ब),

बसपाचे महासचिव काळूराम चौधरी यांच्या कन्या संघमित्रा चौधरी (प्रभाग १४ अ),

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहराध्यक्ष आरती शेंडगे-गव्हाळे (प्रभाग १३ अ),

प्रभाग २० मधून माजी नगरसेवक निलेश इंगोले,

प्रभाग १० व मधून मनीषा बनकर यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, मनीषा बनकर यांनी अजित पवार गटाच्या महिला शहराध्यक्ष अनिता गायकवाड यांचा पराभव करत लक्षवेधी विजय मिळवला आहे.

एकूणच, बारामती नगरपरिषदेवर अजित पवार गटाचे वर्चस्व कायम राहिले असले, तरी वाढता विरोध आणि काही प्रभागांतील पराभव हा आगामी राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचा संदेश देणारा मानला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिया गोयलचे नशीब: हत्येचा आरोप एक गोष्ट आहे, सिद्ध करणे ही दुसरी गोष्ट आहे

सिया गोयल आणि केतन अग्रवाल "दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष"नवी दिल्ली/पुणे: एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याची मंगेतर आणि तिचा कथित प्रियकर तुरुंगात आहेत....

*फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह   फलटण   विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

error: Content is protected !!