Homeताज्या बातम्यापुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडून खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम : डॉ. पंडित वि‌द्यासागर

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडून खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम : डॉ. पंडित वि‌द्यासागर

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या क्रीडामहोत्सवाचे उदघाटन

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ उच्च प्रतिचे शिक्षण देण्यासाठी मूलभूत सुविधांबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करत आहे. खेळात यश अपयशा पेक्षा व्यक्तिमत्त्व विकास हा महत्त्वाचा भाग असतो. नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ हा महत्त्वाचा घटक असून खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम ही संस्था अशा क्रीडा स्पर्धातून करत आहे. ही बाब अभिनंदनास्पद आहे. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित वि‌द्यासागर यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने आयोजित जिल्हा क्रीडामहोत्सवाचे आयोजन वाघीरे महाविद्यालय सासवड येथे करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या क्रीडामहोत्सवाचे उदघाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या शुभहस्ते झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित वि‌द्यासागर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहायक क्रीडा संचालक प्रा. सुदाम शेळके, सासवडी नगर परिषदेचे नगराध्यक्ष आनंदीकाकी जगताप, जेजुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, पोलीस उपनिरीक्षक जोत्सना भालेराव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे उपस्थित होते. या प्रसंगी बंडूकाका जगताप, बाळासाहेब भिंताडे, बाळासाहेब कामथे, आझमभाई पानसरे, नवनाथ बोरावके,संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. संगीता जगताप, प्राचार्य डॉ. पंडीत शेळके, प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण त्याचप्रमाणे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सामूहिक प्रयत्नातून नेत्रदीपक अशा क्रीडा महोत्सवाचे आयोजन करते. यातून निच्छितच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील असा विश्वास आहे. असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले. पोलीस उपनिरीक्षक जोत्सना भालेराव यांनी संस्थेने क्रीडा स्पर्धांसाठी दिलेलेल्या प्रोत्साहनामुळे मी माझे करिअर घडवू शकले असे सांगितले.

मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी प्रास्ताविकात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळात प्रोत्साहन मिळावे या हेतूने संस्थेच्यावतीने दरवर्षी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जात असून या स्पर्धेतून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होत आहेत. या स्पर्धेत ४००० खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धांचे फलित म्हणजे संस्थेच्या विविध शाखांतील खेळाडू राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नैपुण्य मिळवत आहेत. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण ७१ सुवर्ण, ५२ रौप्य आणि २८ कास्य पदके प्राप्त केली असल्याचे सांगितले.

कुलगुरू डॉ. गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. छात्रसेना, स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी शानदार संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली. विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी योगासने, मलखांब प्रात्यक्षिके, ढोल पथक, तसेच बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू गणेश तोटे व मिस्टर यूनिवर्स संकेत काळे यांनी खेळाडूंना शपथ दिली.

यावेळी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या ‘काही प्रॉब्लेम ये का?’ एकांकिकेने बाजी मारत महाराष्ट्रीय कलोपासक पुणे आयोजित हिरकमहोत्सवी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत महाअंतिम फेरीमध्ये राज्यात तिसरा क्रमांक पटकावल्याबद्दल प्राचार्य व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड, डॉ. किरण गाढवे यांनी केले. तर आभार प्राचार्य डॉ.पंडीत शेळके यांनी मानले. संस्थेतील सर्व शाखाप्रमुख आणि क्रीडाशिक्षक यांनी या क्रीडा महोत्सवाचे संयोजन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिया गोयलचे नशीब: हत्येचा आरोप एक गोष्ट आहे, सिद्ध करणे ही दुसरी गोष्ट आहे

सिया गोयल आणि केतन अग्रवाल "दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष"नवी दिल्ली/पुणे: एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याची मंगेतर आणि तिचा कथित प्रियकर तुरुंगात आहेत....

*फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह   फलटण   विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

error: Content is protected !!