Homeताज्या बातम्याजाधववाडी पंचायत समिती गणातून हिंदुराव गायकवाड यांच्या नावाची जोरदार चर्चा

जाधववाडी पंचायत समिती गणातून हिंदुराव गायकवाड यांच्या नावाची जोरदार चर्चा

फलटण पंचायत समितीच्या नव्याने स्थापन झालेल्या जाधववाडी गणातून सामाजिक कार्यकर्ते हिंदुराव गायकवाड हे आगामी पंचायत समिती निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना सध्या जोरदार उधाण आले आहे.

या जाधववाडी गणामध्ये जाधववाडी (फ), झिरपवाडी, दालवडी, विंचुर्णी, कुरवली खुर्द, जोरकुरवली खुर्द पुनर्वसन, तावडी, ठाकुरकी, गोळेगाव पुनर्वसन, सासकल, निरगुडी व मांडवखडक अशा बारा गावांचा समावेश करण्यात आला आहे. लोकसंख्या, भौगोलिक व्याप्ती आणि सामाजिक रचनेमुळे हा गण राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

हिंदुराव गायकवाड यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. गोरगरिब, शेतकरी, कष्टकरी व बांधकाम कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. क्रांतिसूर्य कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी तब्बल ३० हजारांहून अधिक शेतकरी, कष्टकरी व बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत, जाधववाडी गणात त्यांच्या नावाची चर्चा जोमाने सुरू असून स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत उत्सुकता वाढली आहे. आगामी काळात हिंदुराव गायकवाड प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरतात का, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवाळीच्या सुट्टीतही पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ रस्त्यावर; फलटणमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्वतः मैदानात!

0
दिवाळीच्या सुट्टीतही पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ रस्त्यावर; फलटणमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्वतः मैदानात! क्रांतिसिंह नाना पाटील चौकासह एएसयू परिसरातील वाहतूक सुरळीत; पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेचे प्रवाशांकडून...

फलटण ते श्रीक्षेत्र अक्कलकोट भव्य पायी पालखी रथ सोहळ्याचे नियोजन जाहीर! स्वामी समर्थ...

0
फलटण ते श्रीक्षेत्र अक्कलकोट भव्य पायी पालखी रथ सोहळ्याचे नियोजन जाहीर! स्वामी समर्थ सेवा मंडळाचा सातवा वर्षपूर्ती सोहळा; १३ नोव्हेंबरला भक्तिमय वातावरणात पालखीचे प्रस्थान, २५...

लायन्स क्लब व माळजाई मंदिर उद्यान समिती यांचा दिवाळी फराळाच्या निमित्ताने फलटणच्या मान्यवरांचा स्नेहमेळावा;...

0
लायन्स क्लब व माळजाई मंदिर उद्यान समिती यांचा दिवाळी फराळाच्या निमित्ताने फलटणच्या मान्यवरांचा स्नेहमेळावा; स्वच्छता, सौंदर्यीकरण व शहर विकासावर विचारमंथन फलटण कोरेगाव मतदारसंघाचे आमदार...

श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मंदिराची आकर्षक पुष्पसजावट; १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय...

0
श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मंदिराची आकर्षक पुष्पसजावट; १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय फलटणकरांचे आकर्षण!   फलटण : प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक फलटण...

फलटणमध्ये श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र! ...

0
फलटणमध्ये श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र! दिवाळी पाडव्यानिमित्त रविवार पेठेतील तालीम चौकात आकर्षक रोषणाई; आकाशकंदील पाहण्यासाठी नागरिकांची मोठी...

error: Content is protected !!