Homeताज्या बातम्या*अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी*

*अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी*

अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

फलटण .दि. ६ जुलै : भारतीय हवामान विभागाने (IMD) सातारा जिल्ह्यातील घाटमाथा व दुर्गम भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा या पाच तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या, बालवाड्या तसेच सर्व माध्यमांच्या (शासकीय, निमशासकीय व खाजगी) प्राथमिक व माध्यमिक शाळांना सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून या तालुक्यांमध्ये सातत्याने जोरदार पाऊस सुरू असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून सखल भागात पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा धोकादायक ठरू शकते. तहसीलदार, तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच शालेय शिक्षण विभागाच्या २ ऑगस्ट २०१९ च्या परिपत्रकानुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. संबंधित सर्व शाळा प्रशासनाने आदेशाची तात्काळ आणि काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नदी-नाल्यांच्या परिसरात न जाण्याचे आणि हवामान विभाग व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर...

0
🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचा स्तुत्य उपक्रम; सर्पदंश व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत...

शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रा. डॉ. वैशाली शिंदे निवडणूक रिंगणात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जाहीरनामा...

0
शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रा. डॉ. वैशाली शिंदे निवडणूक रिंगणात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जाहीरनामा प्रसिद्ध; जुनी पेन्शन, TET सक्ती रद्द आणि १०० टक्के अनुदानासह विविध प्रश्नांवर...

फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन

0
राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ; १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू होणार? फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन समर्थ 24 तास न्यूज...

राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने...

0
राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने धुव्वा; फलटणच्या संघाची स्पर्धेत दणदणीत आगेकूच समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण, प्रतिनिधी...

*छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा*

0
### छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा मुंबईतील आंदोलन तीव्र करण्याचा दोन्ही पक्षप्रमुखांचा इशारा; महाराष्ट्र सैनिकांसह शिवसैनिकांची मोठी उपस्थिती समर्थ 24 तास...

error: Content is protected !!