Homeताज्या बातम्याअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना न्याय देण्याकरिता आयोग कटिबद्ध- उपाध्यक्ष...

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना न्याय देण्याकरिता आयोग कटिबद्ध- उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम

पुणे, दि.३०: महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक न्यायाची प्रतिबद्धता दाखविण्यासोबतच ती प्रतिष्ठापित करण्याकरिता आयोग कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत केले.

ॲड. मेश्राम म्हणाले, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाची १ मार्च २००५ रोजी स्थापना झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०२४ मध्ये आयोगाचे पृथक्करण करत वैधानिक दर्जा देण्याचे काम केले. यामाध्यमातून सामाजिक न्यायाबद्दल असलेली त्यांची प्रतिबद्धता, संवेदनशीलता दिसून येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (बार्टी), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टार्टी) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यासंस्थेच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येते. यामध्यमातून त्यांचे राज्याच्या जडणघडण आणि विकासामध्ये योगदान निर्मितीच्या अनुषंगाने या संस्थेच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे. या संस्थेच्या कामकाजावर आयोगाचे लक्ष असून कामकाजात अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.

काल पार पडलेल्या जन सुनावणीमध्ये बँकिंग सोल्यूशन (बीएस) एज्युकेशन संस्थेबाबत विविध माध्यमातून प्राप्त तक्रारीची दखल घेत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेला सखोल चौकशी करुन वस्तुनिष्ठ अहवाल आयोगाकडे १५ दिवसात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, या अहवालानुसार संबंधित संस्थेवर उचित कार्यवाही करण्यात येईल, असेही ॲड. मेश्राम यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये परावर्तन होत असतांना नगर विकास प्रशासनाच्यावतीने सफाई कर्मचारी या पदाचा आकृतीबंधात समावेश केलेला नाही, त्यामुळे अशा कर्मचारी, त्यांच्या कुटुंबियांना शासकीय लाभापासून वंचित राहावे लागले, याबाबत आयोगाने गंभीर दखल घेत नगर विकास प्रशासनाला तात्काळ प्रभावासह कारणे दाखवा नोटीस बजावली असून या पदाला आकृतीबंधात समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे, असेही ॲड. मेश्राम म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्री-एसआयआर मतदार मॅपिंगमध्ये पुणे, मुंबई अजूनही मागे आहेत

सध्या सुरू असलेले प्री-स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) मॅपिंग व्यायाम पुणे आणि मुंबईसह शहरांमध्ये संथ गतीने सुरू आहे, वरिष्ठ निवडणूक अधिकारी त्याचे श्रेय...

महाराष्ट्राची गणना आजपासून सुरू होत असताना नागरिकांना उत्तर देण्यासाठी 33 प्रश्न

डॉ निरुपमा जे डांगे | भारत सरकारचे सहसचिव आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी" decoding="async" fetchpriority="high"/>डॉ निरुपमा ज डांगे | भारत सरकारचे सहसचिव...

*एका बाजूला “पर्यावरण वाचवा”चे संदेश दिले जात असताना दुसऱ्या बाजूला वाढलेली झाडे तोडली जात...

फलटण वनखात्याकडून अक्षम्य चूक समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. शहरातील विमानतळ शेजारील वन विभागाच्या जागेत असलेल्या झाडांची अचानक तोड झाल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली...

*फलटण तालुक्यात मळीची अवैध वाहतूक सुरुच महसूलाला कोट्यावधींचा फटका कारवाईची मागणी तीव्र*

फलटण तालुक्यात मळीची अवैध वाहतूक सुरूच; महसूलाला कोट्यवधींचा फटका, कारवाईची मागणी तीव्र   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : फलटण तालुक्यात विनापरवाना मळीची अवैध वाहतूक...

ISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतात

यावर्षी ICSE परीक्षेत महाराष्ट्रातील मुलांनी मुलींच्या 99.93% उत्तीर्णतेशी बरोबरी केली, ही एक महत्त्वपूर्ण बदल आहे. मुलींनी ISC निकालांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली असताना,...

error: Content is protected !!