Homeताज्या बातम्या*अवकाळी पावसाने फलटणकरांना दिलासा; वादळी वाऱ्याने व्यापारी व शेतकरी चिंतेत*

*अवकाळी पावसाने फलटणकरांना दिलासा; वादळी वाऱ्याने व्यापारी व शेतकरी चिंतेत*

अवकाळी पावसाने फलटणकरांना दिलासा; वादळी वाऱ्याने व्यापारी व शेतकरी चिंतेत

फलटण : शहर व तालुक्यात आज अचानक हवामानात मोठा बदल होऊन विजेच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या आठवडाभरापासून वाढलेल्या असह्य उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे.

सकाळपासूनच कडक ऊन आणि प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र दुपारनंतर अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटामुळे वातावरण दणाणून गेले. या अचानक बदलामुळे रस्त्यावर असलेल्या नागरिकांची, कामगारांची आणि वाहनधारकांची सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यासाठी धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले होते. घामाच्या धारांनी त्रस्त झालेल्या फलटणकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून शहरात गारवा पसरला आहे.

दरम्यान, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. काढणीला आलेली पिके तसेच फळबागांना वादळी वाऱ्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे बळीराजाच्या मनात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

अचानक झालेल्या पावसामुळे शहरातील व्यापाऱ्यांचीही मोठी धावपळ झाली. हातगाडी विक्रेत्यांना आपला माल सुरक्षित ठेवण्यासाठी घाईगडबड करावी लागली. वादळी वाऱ्यामुळे अनेक दुकानांत धूळ शिरल्याने खाद्यपदार्थ व शोभेच्या वस्तूंचे नुकसान झाल्याची नोंद आहे.

एकूणच, या पावसाने नागरिकांना दिलासा दिला असला तरी व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी तो चिंतेचा विषय ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिया गोयलचे वडील म्हणतात की व्हायरल ‘मिडल फिंगर’ क्षण कारच्या दरवाजाच्या अपघातामुळे झाला

पुणे : केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलीस कोठडीत असताना आपल्या मुलीने अश्लील हावभाव केल्याचा आरोप सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांनी शनिवारी...

‘लग्न जे कधीच होणार नाही’: सिया गोयलचा मित्राला ‘स्नॅपचॅट मेसेज’ व्हायरल झाला

सिया गोयलचा समावेश असलेल्या स्नॅपचॅट संभाषणाचा कथित स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी तिला न्यायालयीन कोठडीत...

‘लग्नाचे 4 महिन्यांचे नियोजन’: सिया गोयलचा मंगेतर केतन अग्रवालचा जुना व्हिडिओ पुन्हा समोर आला

पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांचा मृत्यूच्या काही दिवस आधी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पुन्हा ऑनलाइन व्हायरल झाला आहे. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल, त्याच्या...

*राष्ट्रीय पिंच्याक सिलट स्पर्धेत योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश*

*राष्ट्रीय पिंच्याक सिलट स्पर्धेत योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश*   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क   नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत बारामतीच्या योद्धा...

पावसात झाडांना टँकरने पाणी दिल्याने संताप

नागरिक कार्यकर्ते संदीप खर्डेकर यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली असून, पाण्याचा असा अपव्यय तातडीने थांबवावा. पुणे : शुक्रवारी मुसळधार पाऊस...

error: Content is protected !!