Homeताज्या बातम्या*आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव* *शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील...

*आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव* *शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल*

आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण

जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी, ता. फलटण, जि. सातारा यांच्या वतीने भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षक पुरस्कार व सेवानिवृत्त शिक्षक गुणगौरव समारंभाचे आयोजन महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे करण्यात आले.

या समारंभात जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा, खटके वस्ती येथील उपक्रमशील शिक्षिका सौ.उर्मिला बाळासो वसव यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

फलटण येथे आयोजित या गुणगौरव समारंभात सातारा जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांच्या शुभहस्ते उर्मिला बाळासो वसव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवीचे अध्यक्ष तथा सातारा जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सहकारी सूर्यजित कदम होते. फलटण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. मठपती साहेब, संकपाळ साहेब तसेच मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

सौ.उर्मिला बाळासो वसव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातील त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या या सन्मानामुळे सहकारी शिक्षक, मित्रपरिवार तसेच खटकेवस्ती व परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सौ. उर्मिला बाळासो वसव यांना आई प्रतिष्ठान तर्फे राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच शासकीय शिक्षक निबंध स्पर्धेत जिल्हा स्तरावर यश मिळवले आहे. शाळा सुधारणा संघटना आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व स्पर्धा व स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवून दिले आहे. तसेच काही विशेष दिनाचे औचित्य साधून आयोजित महारक्तदान शिबिरात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य त्या सातत्याने करीत आहेत.

या कार्यक्रमास प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन शशिकांत सोनवलकर, विषयतज्ज्ञ दत्तात्रय कुंभार, विनोद भोडे, शिक्षण विस्ताराधिकारी दशरथ निकाळजे, केंद्रप्रमुख डी. के. कदम, संभाजी कदम, तुकाराम कदम, शहाजी जाधव, केंद्रप्रमुख शेखर चांगण, केंद्र समन्वयक कुंभार मॅडम,प्रविण जाधव यांच्यासह जय भवानी एज्युकेशन सोसायटीतील मुख्याध्यापक, शिक्षक, प्राथमिक शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख तसेच खटकेवस्ती शाळेतील सर्व सहकारी शिक्षक उपस्थित होते.

सौ.उर्मिला बाळासो वसव यांचे या उल्लेखनीय सन्मानाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! 🌹💐

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल*! *प्रभाग क्रमांक १८५ आणि...

0
धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल! समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. मुंबई प्रभाग क्रमांक १८५ आणि ९० फूट मार्गावरील कचरा न उचलल्याने नागरिक...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर*   **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार**   **दालवडी, प्रतिनिधी :**...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर* **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मोदी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार** समर्थ 24 तास...

*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी...

0
*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी; तहसीलदारांना निवेदन, आंदोलनाचा इशारा* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण **फलटण,...

*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव...

0
*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव च्या वेताळबाबा मंदिरात महाआरती चे नियोजन* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण पासून...

error: Content is protected !!