Homeताज्या बातम्या*इयत्ता १०वी (एस .एस. सी) बोर्ड परीक्षा फलटण तालुक्याचा निकाल ९२.४४%*

*इयत्ता १०वी (एस .एस. सी) बोर्ड परीक्षा फलटण तालुक्याचा निकाल ९२.४४%*

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, यामध्ये फलटण तालुक्याने ९२.४४ टक्के निकालासह घवघवीत यश संपादन केले आहे. आज दुपारी निकाल ऑनलाईन प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

फलटण तालुक्यातून या परीक्षेसाठी एकूण ४ हजार ०८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, ज्यामध्ये २ हजार ०७६ मुले आणि १ हजार ९३२ मुलींचा समावेश होता. यापैकी ३ हजार ९९६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली होती. जाहीर झालेल्या निकालानुसार, एकूण ३ हजार ६९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लिंगनिहाय निकालाचा विचार करता, परीक्षेला बसलेल्या २ हजार ०६९ मुलांपैकी १ हजार ८६४ मुले उत्तीर्ण झाली आहेत, तर १ हजार ९२७ मुलींपैकी १ हजार ८३० मुलींनी परीक्षेत यश मिळवले आहे.

एकूण निकालामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी सरस असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांनी आपला दर्जा टिकवून धरल्याचे या निकालावरून स्पष्ट होत असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने आणि तालुक्यातील शिक्षक वृंदाने विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह   फलटण   विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

error: Content is protected !!