‘उषा-वैभव’ पुरस्काराने डॉ. प्रसाद जोशी होणार सन्मानित
यंदाचा मानाचा “उषा-वैभव” पुरस्कार फलटण येथील प्रसिद्ध डॉ. प्रसाद जोशी यांना जाहीर झाला आहे.हा पुरस्कार सोहळा रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सजाई गार्डन येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते डॉ. जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
याच पार्श्वभूमीवर अनुबंध कला मंडळाच्या वतीने ‘मॅजिकल आर. डी. नाईट’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमामुळे संपूर्ण सोहळ्याला अधिक रंगत येणार आहे.
सांस्कृतिक, सामाजिक आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संस्मरणीय ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


























