Homeताज्या बातम्याकोळकी जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या सह्याद्री कदम यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद; सौ....

कोळकी जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या सह्याद्री कदम यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद; सौ. चाहत कदम प्रचारात सक्रीय

कोळकी (प्रतिनिधी) :उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे गेल्या दोन दिवसांपासून स्थगित करण्यात आलेला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आजपासून पुन्हा जोमाने सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोळकी जिल्हा परिषद गटातून शिवसेना मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सह्याद्री चिमणराव कदम यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या प्रचारार्थ सुविद्य पत्नी सौ. चाहत सह्याद्री कदम यांनी हाऊस टू हाऊस पदयात्रेला सुरुवात केली आहे.

स्वर्गीय माजी आमदार चिमणराव कदम यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा तसेच पुनर्रचनेनंतर नव्याने निर्माण झालेला कोळकी जिल्हा परिषद गटातून त्यांचे चिरंजीव सह्याद्री कदम हे शिवसेना शिंदे गटाच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. स्वर्गीय चिमणराव कदम यांनी या भागात केलेल्या भरीव विकासकामांची पोचपावती म्हणून सह्याद्री कदम यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन त्यांच्या स्नुषा सौ. चाहत कदम मतदारांशी संवाद साधताना करत आहेत. त्यांच्या पदयात्रेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कोळकी जिल्हा परिषद गटात सह्याद्री कदम यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक विकासकामांना गती देतानाच महिला सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे सौ. चाहत कदम यांनी सांगितले. महिलांना स्वावलंबी बनवून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील. महिलांच्या आरोग्यासाठी गावागावात आरोग्य शिबिरांचे आयोजन, तसेच ग्रामसभा घेऊन त्या माध्यमातून स्थानिक प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

एकूणच, कोळकी जिल्हा परिषद गटात सह्याद्री कदम यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून निवडणूक लढत अधिक चुरशीची होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिया गोयलचे नशीब: हत्येचा आरोप एक गोष्ट आहे, सिद्ध करणे ही दुसरी गोष्ट आहे

सिया गोयल आणि केतन अग्रवाल "दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष"नवी दिल्ली/पुणे: एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याची मंगेतर आणि तिचा कथित प्रियकर तुरुंगात आहेत....

*फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह   फलटण   विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

error: Content is protected !!