Homeताज्या बातम्या*गणेशोत्सवाची कला-संस्कृती जगभर पोहोचविण्याचे आवाहन* *Bappa.org वर गणेशोत्सवाची छायाचित्रे, व्हिडीओ आणि...

*गणेशोत्सवाची कला-संस्कृती जगभर पोहोचविण्याचे आवाहन* *Bappa.org वर गणेशोत्सवाची छायाचित्रे, व्हिडीओ आणि माहिती अपलोड करण्याचे आवाहन*

गणेशोत्सवाची कला-संस्कृती जगभर पोहोचविण्याचे आवाहन

Bappa.org वर गणेशोत्सवाची छायाचित्रे, व्हिडीओ आणि माहिती अपलोड करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

फलटण, प्रतिनिधी : महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा, कला, संस्कृती आणि सामाजिक सहभाग जागतिक पातळीवर पोहोचविण्यासह युनेस्कोच्या वारसा दर्जासाठी दावा करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप डिजिटल माध्यमातून जतन करून ते देश-विदेशातील नागरिकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

सातारा जिल्ह्याला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लोकपरंपरेचा वारसा लाभला आहे. गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी पारंपरिक कला, लोककला, धार्मिक परंपरा, सामाजिक उपक्रम, देखावे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या सर्व परंपरांचे डिजिटल दस्तऐवजीकरण झाल्यास पुढील पिढ्यांसाठी हा सांस्कृतिक ठेवा जतन करण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमासाठी Bappa.org हे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्वतंत्र अॅप डाउनलोड करण्याची आवश्यकता नसून, नागरिकांना या मंचावर आपल्या घरातील किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपतीची चांगल्या दर्जाची छायाचित्रे तसेच गणेशोत्सवाची माहिती देणारा दोन ते चार ओळींचा मजकूर अपलोड करता येणार आहे.

येथे करा छायाचित्रे व व्हिडीओ अपलोड

गणेशोत्सवाशी संबंधित स्थानिक कला, सांस्कृतिक परंपरा, धार्मिक प्रथा, सामाजिक उपक्रम, मंडळांचे उपक्रम, आकर्षक देखावे आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण बाबींचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यासाठी Bappa.org या व्यासपीठाचा उपयोग करता येणार आहे. घरगुती गणपती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आपल्या गणेशोत्सवाची छायाचित्रे आणि व्हिडीओ या माध्यमातून अपलोड करता येणार आहेत.

या उपक्रमामुळे सातारा जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या विविध पैलूंची डिजिटल नोंद निर्माण होण्याबरोबरच महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची माहिती जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, गणेशोत्सव मंडळे तसेच नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा. आपल्या परिसरातील गणेशोत्सवाची कला, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक योगदानाची माहिती मोठ्या प्रमाणात डिजिटल माध्यमावर उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

तसेच या उपक्रमाची जिल्ह्यात व्यापक प्रसिद्धी करून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव* *शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची...

0
आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी, ता. फलटण,...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर*   **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार**   **दालवडी, प्रतिनिधी :**...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर* **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मोदी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार** समर्थ 24 तास...

*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी...

0
*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी; तहसीलदारांना निवेदन, आंदोलनाचा इशारा* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण **फलटण,...

*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव...

0
*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव च्या वेताळबाबा मंदिरात महाआरती चे नियोजन* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण पासून...

error: Content is protected !!