Homeताज्या बातम्यागणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण पोलिसांची धडक कारवाई. ४३ जणांवर तडीपारीची कारवाई; १,४७० जणांना...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण पोलिसांची धडक कारवाई. ४३ जणांवर तडीपारीची कारवाई; १,४७० जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा

*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण पोलिसांची धडक कारवाई

४३ जणांवर तडीपारीची कारवाई; १,४७० जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

फलटण : आगामी गणेशोत्सव २०२६ शांततेत, उत्साहात आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून पार पडावा, यासाठी फलटण शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला वेग दिला आहे. उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर व तालुक्यातील रेकॉर्डवरील तब्बल ४३ जणांवर तडीपारीची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६३ (२) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.

प्रशासनाच्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री ००:०१ वाजल्यापासून ते २६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत संबंधित ४३ इसमांना फलटण शहर व तालुका हद्दीत प्रवेश करण्यास, वावरण्यास अथवा थांबण्यास मनाई करण्यात आली आहे. या कारवाईत मलठण, खाटीकगल्ली, कसबा पेठ, रविवार पेठ, नरसिंह चौक, जाधववाडी, कुरेशी नगर, महतपुरा पेठ तसेच परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.

इतर प्रतिबंधात्मक कारवाया

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या आहेत. BNSS कलम १६८ अन्वये १,४७० संशयित व उपद्रवी इसमांना पूर्वसूचना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

तसेच BNSS कलम १२६ अन्वये ९४ जणांवर, BNSS कलम १२९ अन्वये ३ जणांवर, प्रोव्हिषन कायद्यांतर्गत ७ जणांवर, तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये विविध कलमांखाली कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. एका सराईत गुन्हेगाराचा तडीपारीचा प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

शांतता व समन्वयावर भर

गणेशोत्सव काळात सामाजिक सलोखा व शांतता कायम राहावी, यासाठी पोलिसांनी ५ शांतता कमिटी बैठका, ७ पोलीस मित्र बैठका, १० पोलीस-नागरिक समन्वय बैठका आणि १२ इतर विभागांच्या समन्वय बैठका घेतल्या आहेत. या बैठकीत गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच नागरिकांना उत्सव शांततेत साजरा करण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

ही कडक प्रतिबंधात्मक कारवाई सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी घनश्याम बल्लाळ यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश…* *शंभूराज...

0
*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश...* *शंभूराज वर कौतुकाचा वर्षाव* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण मुर्तीजापुर अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय...

*रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही; जयकुमार गोरे यांचा निर्धार*

0
*रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही; जयकुमार गोरे यांचा निर्धार* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण सुरवडी : फलटणचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे...

*लहान वयातच वाहतूक नियमांचे संस्कार करा : सचिन विधाते*

0
मुलांना लहानपणापासून वाहतूक नियमांचे शिक्षण द्यावे सचिन विधाते; धुमाळवाडीत रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क ‘फळांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडीतील...

*सलग दुसऱ्या वर्षी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार मुधोजी हायस्कूलचा मुलींचा...

0
सलग दुसऱ्या वर्षी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार मुधोजी हायस्कूलचा मुलींचा हॉकी संघ; ऐतिहासिक कामगिरी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क . फलटण क्रीडा...

*तात्यांच्या ७५ वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव* *मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची...

0
तात्यांच्या ७५ वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती; सुरवडीत अभिष्टचिंतन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण सुरवडी, ता....

error: Content is protected !!