Homeताज्या बातम्या*तळिये गावात गॅस्ट्रोचा उद्रेक; ५५९ नागरिक बाधित* *१५० रुग्णांवर विविध शासकीय रुग्णालयांत...

*तळिये गावात गॅस्ट्रोचा उद्रेक; ५५९ नागरिक बाधित* *१५० रुग्णांवर विविध शासकीय रुग्णालयांत उपचार; रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांची रुग्णांची भेट*

तळिये गावात गॅस्ट्रोचा उद्रेक; ५५९ नागरिक बाधित

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण

१५० रुग्णांवर विविध शासकीय रुग्णालयांत उपचार; रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांची रुग्णांची भेट

कोरेगाव : उत्तर कोरेगाव भागातील तळिये गावात गेल्या दोन दिवसांपासून गॅस्ट्रोच्या आजाराने थैमान घातले असून, गावातील सुमारे ५५९ नागरिकांना या आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी सुमारे १५० नागरिकांवर पळशी, पिंपोडे बु. आणि वाठार स्टेशन येथील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. काही रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यामुळे हा आजार उद्भवल्याची प्राथमिक माहिती असून, प्रशासन व आरोग्य विभागाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.

गावात मोठ्या प्रमाणावर नागरिक गॅस्ट्रोच्या आजाराने त्रस्त झाल्याची माहिती मिळताच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी तळिये गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी गावातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच विविध शासकीय रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना त्यांनी घाबरून न जाता आवश्यक ती वैद्यकीय उपचारपद्धती घेण्याचे आवाहन केले. रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली. रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या नागरिकांना उपचारामध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना

गावातील परिस्थिती लक्षात घेता आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक रुग्णाची योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच गावातील नागरिकांच्या आरोग्याची नियमित तपासणी, आवश्यक औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, सिव्हिल सर्जन डॉ. राहुल जाधव, कोरेगाव प्रांत अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार संगमेश कोडे यांच्यासह आरोग्य व प्रशासनातील विविध अधिकारी उपस्थित होते.

परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये यासाठी संबंधित सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गावातील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती, नागरिकांच्या आरोग्याची स्थिती आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या यावर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

नागरिकांमध्ये चिंता; प्रशासनाकडून उपाययोजनांना वेग

गेल्या दोन दिवसांत अचानक मोठ्या संख्येने नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने तळिये गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उलट्या, जुलाब, अशक्तपणा यांसारखी लक्षणे आढळून येत असल्याने नागरिकांनी तत्काळ वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, गावातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी वापरणे, पाणी उकळून पिणे तसेच वैयक्तिक स्वच्छता राखण्याबाबत आरोग्य विभागाकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभाग, महसूल प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा समन्वयाने काम करीत आहेत.

तळिये गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने आवश्यक सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असून, परिस्थितीवर प्रशासनाची नजर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश…* *शंभूराज...

0
*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश...* *शंभूराज वर कौतुकाचा वर्षाव* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण मुर्तीजापुर अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय...

*रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही; जयकुमार गोरे यांचा निर्धार*

0
*रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही; जयकुमार गोरे यांचा निर्धार* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण सुरवडी : फलटणचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे...

*लहान वयातच वाहतूक नियमांचे संस्कार करा : सचिन विधाते*

0
मुलांना लहानपणापासून वाहतूक नियमांचे शिक्षण द्यावे सचिन विधाते; धुमाळवाडीत रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क ‘फळांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडीतील...

*सलग दुसऱ्या वर्षी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार मुधोजी हायस्कूलचा मुलींचा...

0
सलग दुसऱ्या वर्षी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार मुधोजी हायस्कूलचा मुलींचा हॉकी संघ; ऐतिहासिक कामगिरी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क . फलटण क्रीडा...

*तात्यांच्या ७५ वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव* *मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची...

0
तात्यांच्या ७५ वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती; सुरवडीत अभिष्टचिंतन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण सुरवडी, ता....

error: Content is protected !!