Homeताज्या बातम्यादहा हजारांचे पाकीट..आणि चार विद्यार्थ्यांची लाखमोलाची प्रामाणिकता!

दहा हजारांचे पाकीट..आणि चार विद्यार्थ्यांची लाखमोलाची प्रामाणिकता!

गिरवी नाका परिसरात हरवलेले दहा हजारांचे पाकीट शालेय विद्यार्थ्यांनी परत केले; प्रामाणिकपणाचे फलटणभर कौतुक

फलटण दि.०७| फलटण शहरातील गिरवी नाका परिसरात संतोष सुधाकर जाधव (रा. निरगुडी) यांचे दहा हजार रुपये असलेले पाकीट हरवले होते. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे पाकीट सापडल्याची त्यांना कल्पनाही नव्हती. मात्र, शालेय स्तरावर शिक्षण घेत असलेल्या काही संवेदनशील विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणामुळे हे पाकीट सुखरूप त्यांच्या हातावर आले.

गिरवी नाका परिसरात हे पाकीट आदित्य नरसिंह जगताप, धीरज पंढरीनाथ पाटील, विशाल रमेश कदम आणि प्रतीक संतोष लकडे या विद्यार्थ्यांना आढळले. पाकिटात मोठी रक्कम असूनही कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता या विद्यार्थ्यांनी मानवतेच्या भावनेतून त्वरित संतोष जाधव यांच्याशी संपर्क साधून पाकीट परत केले.

विद्यार्थ्यांच्या या प्रामाणिक कृतीचे फलटण परिसरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. समाजात माणुसकी, नैतिकता आणि सद्भावना अजूनही जिवंत असल्याचे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.

संतोष जाधव व निलेश तावरे यांनी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक आभार मानले असून, “आजच्या पिढीत अशी प्रामाणिकता पाहून समाधान वाटते,” असे त्यांनी सांगितले.

ही घटना समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून विद्यार्थ्यांनी दाखवलेली माणुसकी सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

138 पैकी 58 जलदगती न्यायालये सुरू झाली आहेत, बाकी न्यायाधीशांच्या प्रतीक्षेत: मुख्यमंत्री विधानसभेत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना सांगितले की, सरकारने 138 नवीन जलदगती न्यायालये सुरू करण्याच्या योजनेला...

एकाशी निगडीत, दुसऱ्याशी लग्न: सिया गोयलचे अंतिम ‘दुहेरी आयुष्य’ केतन अग्रवाल खून प्रकरणाचा तपास...

मंगेतर केतन अग्रवालच्या हत्येचा आरोप असलेली सिया गोयल ही कथितपणे दुहेरी जीवन जगत होती कारण पोलिस तपासात गुप्त विवाह केल्याचा दावा केला आहे....

सोमवारच्या भूस्खलनानंतर पुणे-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे

पुणे : मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुणे आणि लोणावळा दरम्यानच्या दोन मार्गांपैकी किमान एक मार्ग मंगळवारी संध्याकाळी उशिरापर्यंत कार्यान्वित होणे...

4 धरणांनी पुण्याचा 2 महिन्यांचा पाण्याचा कोटा 24 तासांत मिळवला, जिल्ह्यातील 13 जलाशयांमध्ये प्रत्येकी...

पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात मुसळधार पावसाने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पुणे: सोमवारी सायंकाळी 5 वाजता संपलेल्या अवघ्या 24 तासांमध्ये 2.6 टीएमसी...

*श्रीराम’ वाचवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू; आंदोलनाचे नेतृत्व मीच करणार: रामराजे* *नाईक-निंबाळकर* *आठ दिवसांत सभासदांनी...

श्रीराम' वाचवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू; आंदोलनाचे नेतृत्व मीच करणार: रामराजे नाईक-निंबाळकर आठ दिवसांत सभासदांनी शेअरची रक्कम भरावी; वित्तीय संस्थांकडून भागभांडवल उभारून कारखाना सुरू करू –...

error: Content is protected !!