Homeताज्या बातम्या"अवैध दारू धंद्यावर धाड… पण धाडस कोणाचं? पोलिस की तोतया?"

“अवैध दारू धंद्यावर धाड… पण धाडस कोणाचं? पोलिस की तोतया?”

फलटण (प्रतिनिधी) –फलटण तालुक्यातील पूर्व भागातील आसू गावात गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू धंद्यावर छापा टाकण्यात आल्याची चर्चा असून, या कारवाईत मोठा मुद्देमाल जप्त झाल्याचे सांगितले जाते. एवढेच नव्हे, तर दारू विक्रेत्याला मारहाणही करण्यात आली. मात्र या घटनेची नोंद कोणत्याही पोलिस ठाण्यात नसल्यामुळे कारवाई खरेच पोलिसांनी केली की तोतया पोलिसांनी, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

गावातील सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास सायरन व अंबर दिवा लावलेली गाडी आसू गावच्या मुख्य चौकात पोहोचली. गाडीतून उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट दारू विक्रेत्याच्या घरी छापा घातला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू व संबंधित साहित्य जप्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यावेळी विक्रेत्यास मारहाण करून कारवाई करण्यात आली.

परंतु या प्रकरणात कोणतेही अधिकृत कागदोपत्री कामकाज झालेले नाही. फलटण ग्रामीण पोलिस व बरड पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता, “आम्ही अशी कोणतीही कारवाई केलेली नाही, तसेच या संदर्भात गुन्हा नोंदवलेला नाही,” असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे गावात पोहोचलेली अंबर दिवा लावलेली गाडी नेमकी कोणाची होती? आणि कारवाई करणारे खरे अधिकारी होते की तोतया पोलिस, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, आसू, पवारवाडी, हणमंतवाडी, गुणवरे या भागात हातभट्टीच्या दारूचा धंदा बेधडक सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी केली. कमी दरातील दारू व त्यातून मिळणारा बक्कळ नफा यामुळे विक्रेत्यांना कोणाचीही भीती नाही. उलट संबंधित विभाग गप्प बसल्याची चर्चा सुरू असून, प्रत्येक महिन्यात छापे मारणारी ही गाडी कोणाच्या आश्रयाने काम करते, हा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.

गणेशोत्सवात अशा कारवाया समोर येत असल्याने गावकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, खरे तर अधिकृत कारवाई झाली की तोतया पोलिसांनी धमकावून कारभार केला, याचा शोध घेणे गरजेचे ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

PAT पेपर लीक झाल्यानंतर SCERT ने 6 ऑनलाइन चॅनलविरोधात तक्रार दाखल केली | पुणे...

0
पुणे : परीक्षेपूर्वी सोशल मीडियावर नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पीएटी) III च्या प्रश्नपत्रिका प्रसारित केल्याच्या आरोपावरून व्हिडिओ-सामायिकरण प्लॅटफॉर्मवर सहा चॅनेलच्या संचालकांविरुद्ध मंगळवारी गुन्हा...

पीसीएमसी मेट्रो स्थानकात फीडर बस सेवा सुरू; प्रवाशांना कामकाजात सातत्य हवे

0
पुणे: महा मेट्रो आणि PMPML ने PCMC मेट्रो स्टेशनपासून अनेक मार्गांवर फीडर बस सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे शेवटच्या मैलाची कनेक्टिव्हिटी सुधारली आहे, आतापर्यंत...

*फलटण वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून देशी प्रजातीची झाडे लावण्यात...

0
  फलटण. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण - फलटण वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून देशी प्रजातींची झाडे लावण्यात आली होती. कालांतराने...

हैदराबाद मॉडेलवर अवलंबून राहण्यासाठी ओव्हरहेड केबल्सबाबत पीएमसीचे येऊ घातलेले धोरण

0
पुणे: शहरातील गोंधळलेल्या केबल नेटवर्कचे नियमन करण्यासाठी नागरी प्रशासनाने मंगळवारी मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की नागरी संस्थेने हैदराबादचे मॉडेल...

**रवींद्र बेडकिहाळ यांचे कार्य पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. लघु वृत्तपत्र संपादकांच्या प्रश्नांसाठी* *वाढदिवसाच्या...

0
*हेडिंग - पत्रकारांसाठी भक्कम आधार "रवींद्र बेडकिहाळ"*   महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी ५० वर्षांहून अधिक पत्रकारितेत लघु वृत्तपत्र संपादकांच्या प्रश्नांसाठी...

error: Content is protected !!