फलटण दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यास माहिती मिळाली की दालवडी परिसरात फॉरेस्टच्या बाजूस असलेल्या गाडीत अवैध शस्त्र व गांजा ठेवण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली असता, रविद्र कोलवडकर याच्या मालकीची स्वीफ्ट कार तपासणीसाठी घेण्यात आली.
सदर कार तपासली असता त्यामध्ये गांजा, पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे आढळून आले. याबाबत रविद्र कोलवडकर यांना चौकशी करण्यात आली असता त्यांनी या वस्तू गाडीत कशा आल्या याबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले असून अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) व आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नं. ६१६/२०१५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील चौकशीदरम्यान संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भालचीम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने, वैभव सुर्यवशी, अमोल जगदाळे, नितीन चतुरे, हनुमंत दडस, तात्या कदम, तानाजी ढोले, तुषार नलवडे, कल्पेश काशिद यांनी सहभाग घेतला.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. गोपाळ बदने हे करीत आहेत.


























