पिंपोडे बुद्रुक | प्रतिनिधी – कोचीनपासून ते सुरतेपर्यंत आपल्या प्रामाणिक सेवेने व विनम्र वागणुकीने घुमाई देवी रोडलाईन्सचा नावलौकिक वाढवणारे श्री. बाजीराव विनायकराव लेंभे यांची नुकतीच पिंपोडे बुद्रुक विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाली आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण प्रेमी वसुंधरा समूहामार्फत त्यांचा गौरव करण्यात आला.
समूहाच्या पर्यावरणपूरक परंपरेनुसार श्री. लेंभे यांना वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक बांधिलकी, व्यावसायिक प्रामाणिकपणा आणि गावाच्या विकासासाठी असलेली त्यांची तळमळ यामुळेच त्यांची या पदावर निवड झाल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
या सत्कारप्रसंगी शाम कुलकर्णी, संतोष कुंभार, गणेश महाजन, अभिजीत लेंभे, राजाराम दगडे (सचिव), शिवाजी साळुंखे (सहसचिव), सुधीर गार्डी, सुनील साळुंखे, कदीर शेख तसेच वसुंधरा समूहाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
श्री. लेंभे यांनी या सत्काराबद्दल आभार मानत, संस्था व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.


























