Homeताज्या बातम्याप्रभाग क्र. १३ मध्ये सौ. रुपाली अमोल सस्ते यांना मतदारांचा वाढता पाठिंबा

प्रभाग क्र. १३ मध्ये सौ. रुपाली अमोल सस्ते यांना मतदारांचा वाढता पाठिंबा

फलटण (प्रतिनिधी जुबेर कोतवाल)│ फलटण नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्र. १३ मधून प्रथमच रिंगणात उतरलेल्या सौ. रुपाली अमोल सस्ते यांना मतदारांचा उत्स्फूर्त व वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अमोल सस्ते हे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे निकटवर्ती, विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.

अमोल सस्ते यांनी भारतीय जनता पक्षाच्या फलटण शहराध्यक्षपदापासून ते तालुकाध्यक्षपदापर्यंतची महत्त्वाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. स्थानिक राजकारणातील त्यांचा दांडगा अनुभव, सर्वसामान्य नागरिकांशी घट्ट असलेला संपर्क आणि सामाजिक कार्याची आवड याचा निश्चित लाभ सौ. रुपाली सस्ते यांच्या प्रचारात दिसून येत आहे. लोकांच्या सुख-दुःखाच्या प्रसंगी सदैव धावून जाणारा नेता म्हणून अमोल सस्ते यांची ओळख आहे.

उमेदवारी अर्ज दाखल होताच सौ. रुपाली अमोल सस्ते यांनी प्रभागात प्रचाराचा जोरदार धडाका लावला आहे. महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक तसेच नवमतदार यांच्याशी घराघरांत जाऊन संवाद साधण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. दरम्यान प्रभागातील नागरिकांकडून मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता प्रभाग क्र. १३ मधून सौ. रुपाली अमोल सस्ते यांच्या विजयाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

निवडणुकीची रणधुमाळी वाढत असताना प्रभाग १३ मध्ये सौ. सस्ते यांच्याविरोधातील स्पर्धकांपेक्षा त्यांना अधिक मोठा लोकसमर्थनाचा पाठिंबा मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*स्मार्ट मीटर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी”*

"स्मार्ट मीटर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी" समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण, दि. ३ जुलै : राज्यात सुरू असलेल्या स्मार्ट...

*पोलिस अधीक्षकांकडून पालखी मार्गाची पाहणी*

पोलिस अधीक्षकांकडून पालखी मार्गाची पाहणी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण जिल्ह्यातून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा १५ ते १८ जुलैदरम्यान मार्गक्रमण करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस...

पुणे पोलिसांनी केतन अग्रवालच्या हत्येशी संबंधित कपडे जप्त केल्याने सिया गोयलने मधले बोट दाखवले

तिचा मंगेतर आणि रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येचा आरोपी सिया गोयल हिने कथितपणे मधले बोट दाखवले. पुणे : तिचा मंगेतर आणि रिअल्टर केतन अग्रवालच्या...

राज्यात केवळ १.२८ लाख, ३.१२ कोटी नाही, भू सर्वेक्षण प्रकरणे प्रलंबित, बावनकुळे म्हणतात

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुणे : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत लेखी उत्तरात सांगितले की, महाराष्ट्रात १.२८ लाख भू सर्वेक्षण प्रकरणे...

सिक्युरिटी एजन्सीच्या मालकाची खंडणी केल्याप्रकरणी गुन्हेगाराला अटक

पुणे : आळंदी-पुणे रोडवरील दिघी येथे सापळा रचून खासगी सुरक्षा एजन्सीच्या मालकाकडून तीन लाख रुपये उकळल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने मंगळवारी एका...

error: Content is protected !!