Homeताज्या बातम्याफलटण, दि. २२ : महिलांचे संरक्षण, बालकांची सुरक्षितता तसेच महिला व बालविकास...

फलटण, दि. २२ : महिलांचे संरक्षण, बालकांची सुरक्षितता तसेच महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना व कायद्यांबाबत जनजागृती करण्यासाठी फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वडजल येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

महिलांचे संरक्षण व बालकांच्या सुरक्षिततेबाबत फलटणमध्ये जनजागृती

‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत वडजल व पिंपरद येथे मार्गदर्शन; ४० ते ५० विद्यार्थ्यांचा सहभाग

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

फलटण, दि. २२ : महिलांचे संरक्षण, बालकांची सुरक्षितता तसेच महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना व कायद्यांबाबत जनजागृती करण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वडजल तसेच सिद्धेश्वर हायस्कूल, पिंपरद येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

जिल्हा परिषद शाळा वडजल येथे मुख्याध्यापक अमोल अर्जुनराव नाळे, दोन शिक्षिका, संरक्षण अधिकारी राजेंद्र शेवाळे व सहायक संरक्षण अधिकारी सुनील गिरी (फलटण) उपस्थित होते. कार्यक्रमास सुमारे ४० ते ५० विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्याध्यापक अमोल अर्जुनराव नाळे यांनी प्रस्तावना केली. त्यानंतर संरक्षण अधिकारी राजेंद्र शेवाळे यांनी ‘सेवा संकल्प अभियान’ तसेच महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना व कायद्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

POCSO कायद्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा २०१२ (POCSO) याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. बालकांवरील लैंगिक शोषण, शारीरिक अत्याचार, लैंगिक छळ तसेच बालकांचे अश्लील फोटो अथवा व्हिडिओ तयार करणे व प्रसारित करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा असल्याचे सांगण्यात आले.

अशा प्रकारची घटना निदर्शनास आल्यास पालक, शिक्षक, पोलीस किंवा संबंधित सरकारी यंत्रणेला तातडीने माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. पीडित बालकांची माहिती गोपनीय ठेवली जाते तसेच त्यांना आवश्यक संरक्षण व मानसिक आधार देण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबत माहिती

कार्यक्रमात कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण कायदा २०१३ याबाबतही माहिती देण्यात आली. शारीरिक स्पर्श, लैंगिक मागणी, अश्लील भाषा किंवा साहित्य दाखविणे आदी प्रकार लैंगिक छळाच्या कक्षेत येतात, असे स्पष्ट करण्यात आले.

तसेच १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या संस्थांमध्ये अंतर्गत तक्रार समिती (ICC) स्थापन करण्याची तरतूद असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५, बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ यांसह महिलांच्या व बालकांच्या संरक्षणाशी संबंधित विविध कायदे व योजनांची माहिती देण्यात आली.

‘सेवा संकल्प अभियान’ हे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असून, महिला व बालविकास विभागाच्या योजना व कायद्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी या जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश…* *शंभूराज...

0
*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश...* *शंभूराज वर कौतुकाचा वर्षाव* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण मुर्तीजापुर अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय...

*रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही; जयकुमार गोरे यांचा निर्धार*

0
*रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही; जयकुमार गोरे यांचा निर्धार* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण सुरवडी : फलटणचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे...

*लहान वयातच वाहतूक नियमांचे संस्कार करा : सचिन विधाते*

0
मुलांना लहानपणापासून वाहतूक नियमांचे शिक्षण द्यावे सचिन विधाते; धुमाळवाडीत रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क ‘फळांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडीतील...

*सलग दुसऱ्या वर्षी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार मुधोजी हायस्कूलचा मुलींचा...

0
सलग दुसऱ्या वर्षी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार मुधोजी हायस्कूलचा मुलींचा हॉकी संघ; ऐतिहासिक कामगिरी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क . फलटण क्रीडा...

*तात्यांच्या ७५ वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव* *मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची...

0
तात्यांच्या ७५ वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती; सुरवडीत अभिष्टचिंतन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण सुरवडी, ता....

error: Content is protected !!