फलटण –फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वार्ड क्र. 2 मध्ये जयश्री गणेश आहिवळे यांच्या नावाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. त्या माजी नगरसेवक गणेश आहिवळे यांच्या पत्नी असून, आपल्या पतींच्या जनसंपर्क व कार्यपद्धतीचा वारसा त्यांनी यशस्वीपणे पुढे नेला आहे.आहिवळे या गेल्या अनेक वर्षांपासून राजे गटाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या असून, त्यांनी फलटण शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे उपक्रम राबवले आहेत. नागरिकांशी सतत संपर्क ठेवून त्यांचे प्रश्न जाणून घेणे व त्यावर उपाय शोधणे, हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते.प्रशांत (बारीक राव) आहिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विश्वासू कार्यकर्त्या म्हणून सौ. आहिवळे यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.यामुळे वार्ड क्र. २ मध्ये त्यांच्या नावाच्या चर्चेला वेग आला असून, सोशल मीडियावर “भावी नगरसेविका जयश्री गणेश आहिवळे” या नावाने स्टेटस आणि पोस्ट्स मोठ्या प्रमाणावर दिसू लागल्या आहेत. नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीची उत्सुकता वाढत आहे.
























