*फलटण मध्ये गुंडगिरी चालून देणार नाही व सामान्य जनतेला न्याय देणार*
*मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर*
शंकर मार्केट परिसरामध्ये हल्लेखोरांच्या भ्याड हल्ल्यात जखमी झालेल्या हिरणवाळे बंधूंची इस्पितळामध्ये जाऊन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी भेट घेतली व जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांनी अनिल हिरणवाळे व संतोष हिरणवाळे व त्यांच्या कुटुंबीयांशी बोलताना सांगितले फलटणचे राजघराणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून या संकटातून सावरण्याचा धीर देत तुमच्यावर ओढवलेले संकट हे केवळ तुमचे एकट्याचे नसून सर्व फलटणकारांचे आहे.याला आळा घालण्यासाठी संबंधित पोलीस प्रशासनाला आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
फलटणचे नाईक निंबाळकर राजघराणे फलटणमध्ये गुंडागर्दी खपवून घेणार नाही आणि अशा प्रकारे कोण दहशत माजवून ऐतिहासिक फलटण शहराची शांतता भंग करणार असेल तर पोलीस प्रशासनाने कुणाच्याही दबावाखाली न येता शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे तितकेच गरजेचे आहे.


























