फलटण शहरातील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम उद्या, मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी हाती घेण्यात येणार असल्याने संपूर्ण फलटण नगरपरिषद हद्दीतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण
त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा साठा जपून व काटकसरीने वापरावा, असे आवाहन फलटण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवार, दि. ४ नोव्हेंबरपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. या तात्पुरत्या पाणीपुरवठा बंदीमुळे नागरिकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी जाहीर प्रकटनाद्वारे केले आहे.
























