Homeताज्या बातम्याबौद्ध भिक्षूंना याचना करण्यापूर्वी उपासकांनी याचनेचा अर्थ समजून घ्यावा "! - पूज्य...

बौद्ध भिक्षूंना याचना करण्यापूर्वी उपासकांनी याचनेचा अर्थ समजून घ्यावा “! – पूज्य भंते काश्यप

फलटण दि.३०| भगवान बुद्धांचा धम्म हा अथांग ज्ञानाचा सागर आहे. त्यामुळे त्या अथांग सागरातील ज्ञान प्रत्यक्ष समजून घेऊन आचरणात आणल्याशिवाय अनुभवता येत नाही. त्यामुळे बौद्ध उपासक व उपासिका यांनी बौद्ध धम्मातील तत्त्व किंवा त्रिसरण -पंचशील पूज्य भंते यांच्याकडून घेण्याअगोदर कराव्या लागणारी याचना तिचा अर्थ समजून घेतला पाहिजे. तर आणि तरच त्या याचनेला काहीतरी अर्थ आहे. असे प्रतिपादन पूज्य भंते काश्यप यांनी समता नगर येथे भारतीय बौद्ध महासभा सभा शाखा फलटण तालुका शाखेच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

पाली भाषेत बौद्ध भिक्षूंना त्रिसरण व पंचशील देण्याची विनंती याचनेद्वारे उपासक उपासिका करतात. पाली भाषेत शुद्ध पद्धतीचा “ओकास वंदामि” (क्षमा व सील ग्रहणासाठी याचना केली जाते. त्याचा मराठी अर्थ आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे.

सर्वप्रथम उपासक उपासिका तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पंचांग प्रणाम करत असतो. हा पंचांग प्रणाम म्हणजे काय आहे? हे पाच अंगांने भगवंताला केलेले वंदना आहे. बुध्दं नमामि । धम्मं नमामि । संघं नमामि । अशी पालिभाषेत याचना केली जाते।। यालाच पंचांग प्रणाम असे संबोधले जाते. त्याचा मराठी मध्ये अर्थ असा होतो की,

मी पाचही अंगांनी (मस्तक, दोन हात, दोन पाय) तथागतांना, धम्माला व संघाला वंदन करून प्रणाम करतो.

बुद्धं नमामि । धम्मं नमामि । संघं नमामि ।

मी बुद्धाला वंदन करतो, धम्माला वंदन करतो, संघाला वंदन करतो.

क्षमा मागणी (ओकास वंदना)”भंते, मला क्षमा द्या. शरीराने, वाणीने आणि मनाने (या त्रिकर्मद्वारांनी) माझ्याकडून जाणून किंवा नकळत झालेली सर्व चूक-गुन्हे मला क्षमा करावी.”हे वाक्य तीनदा म्हटले जाते.

त्यानंतर शील (पंचशील) ग्रहणासाठी याचना केली जाते.

“भंते, मला संधी द्या. मी तिन्ही रत्नांवर (बुद्ध, धम्म, संघ) श्रद्धा ठेवून पंचशील धम्म याची याचना करतो.माझ्यावर करुणा करून मला पंचशील द्या, भंते.” हे वाक्य देखील तीनदा म्हटले जाते.उपासक / उपासिका घोषणा “भंते, मी जे म्हणतो तेच आपण (भंते) म्हणा. मी उपासक (पुरुष) आहे / मी उपासिका (स्त्री) आहे.” प्रथम भिक्षूंकडे क्षमा मागितली जाते (जाणते-अजाणते पाप झाले असल्यास).

त्यानंतर तिसरण (बुद्ध, धम्म, संघ) व पंचशील स्वीकारण्याची विनंती केली जाते. शेवटी आपण बौद्ध धम्माचा उपासक/उपासिका म्हणून घोषित केले जाते. त्यानंतर बौद्ध धम्माचे धम्मगुरु पंचशील देतात.

हिंसा, चोरी, दुराचार, खोटेपणा आणि व्यसन यापासून स्वतःला दूर ठेवणे. त्यामुळे व्यक्तीचे जीवन शांत, शुद्ध आणि नैतिक बनते. शीलामुळे सुगती (चांगला मार्ग) प्राप्त होतो आणि पुढे प्रज्ञा व समाधी साध्य होते.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे फलटण तालुका अध्यक्ष महावीर भालेराव सर, महासचिव बाबासाहेब जगताप सर, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर, संस्कार सचिव बजरंग गायकवाड सर, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे सर, जेष्ठ प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे,ज्येष्ठ साहित्यिक तानाजी जगताप, बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

‘2 महिला सहकाऱ्यांनी अनुकूल काम नाकारले, तज्ञांच्या बाहेर प्रकल्प नियुक्त केले’: पुणे टीसीएस तंत्रज्ञांनी...

पुणे: एका 48 वर्षीय TCS कर्मचाऱ्याचा, ज्याचा या महिन्याच्या सुरुवातीला आत्महत्येने मृत्यू झाला होता, त्याने तीन लोकांवर - दोन महिला सहकाऱ्यांसह -...

error: Content is protected !!