Homeताज्या बातम्यामहसूल सुनावणीतील कार्यपद्धतीवर फलटण वकील संघाचा आक्षेप वकील व पक्षकारांना असौजन्यपूर्ण वागणूक...

महसूल सुनावणीतील कार्यपद्धतीवर फलटण वकील संघाचा आक्षेप वकील व पक्षकारांना असौजन्यपूर्ण वागणूक मिळत असल्याचा आरोप; सुधारणा न झाल्यास कामकाजावर बहिष्काराचा इशारा.

महसूल सुनावणीतील कार्यपद्धतीवर फलटण वकील संघाचा आक्षेप

वकील व पक्षकारांना असौजन्यपूर्ण वागणूक मिळत असल्याचा आरोप; सुधारणा न झाल्यास कामकाजावर बहिष्काराचा इशारा

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

फलटण : उपविभागीय अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ अंतर्गत सुरू असलेल्या अपील व विविध महसूल प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान वकील आणि पक्षकारांना असौजन्यपूर्ण वागणूक मिळत असल्याचा आरोप फलटण वकील संघाने केला आहे. या कार्यपद्धतीत तातडीने सुधारणा न झाल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सर्व न्यायिक व महसूल कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा वकील संघाने निवेदनाद्वारे दिला आहे.

दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या फलटण वकील संघाच्या तातडीच्या बैठकीत याबाबत एकमताने ठराव करण्यात आला. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून सुनावणीची पद्धत आणि प्रशासकीय कार्यवाहीबाबत विविध आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

वकील संघाने उपस्थित केलेले प्रमुख मुद्दे

अयोग्य व अपमानास्पद वागणुकीचा आरोप : सुनावणीदरम्यान वकील तसेच न्यायाच्या अपेक्षेने आलेल्या पक्षकारांशी अनुचित भाषेत संभाषण केले जात असल्याने त्यांचा सन्मान दुखावला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सुनावणीच्या तारखांबाबत गोंधळ : प्रकरणांच्या सुनावणीच्या तारखांची योग्य पूर्वसूचना दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच ऐनवेळी तारीख बदलल्यास त्याची माहिती वकील व पक्षकारांना वेळेत मिळत नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

एकतर्फी आदेशांवर आक्षेप : वकील किंवा पक्षकार वैयक्तिक अथवा अत्यावश्यक कारणामुळे गैरहजर राहिल्यास किंवा मुदतवाढीची मागणी केल्यास त्याचा पुरेसा विचार न करता पक्षकारांच्या हिताविरुद्ध एकतर्फी आदेश पारित केले जात असल्याचा दावा वकील संघाने केला आहे.

निकालाची माहिती वेळेत मिळत नसल्याची तक्रार : प्रकरणाचा निकाल झाल्यानंतर पक्षकारांना त्याची माहिती वेळेत दिली जात नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. “निकाल झाला आहे, नक्कलीसाठी अर्ज द्या,” असे सांगून प्रकरण टाळले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे अपील किंवा पुनर्विलोकन अर्ज दाखल करण्याच्या वैधानिक मुदतीवर परिणाम होऊन पक्षकारांच्या न्यायाच्या हक्कावर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका वकील संघाने मांडली आहे.

सुधारणा न झाल्यास बहिष्काराचा इशारा

सुनावणीदरम्यान वकील व पक्षकारांना सौजन्यपूर्ण वागणूक मिळावी, सुनावणीच्या तारखांची पूर्वसूचना देण्यात यावी, मुदतवाढीच्या अर्जांचा योग्य विचार करण्यात यावा आणि प्रकरणांच्या निकालाची माहिती संबंधितांना वेळेत उपलब्ध करून द्यावी, अशा प्रमुख मागण्या फलटण वकील संघाने केल्या आहेत.

या कार्यपद्धतीत तातडीने सुधारणा न झाल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सर्व न्यायिक व महसूल कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. तसेच, या परिस्थितीमुळे पक्षकारांचे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, अशी सक्त नोंदही वकील संघाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश…* *शंभूराज...

0
*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश...* *शंभूराज वर कौतुकाचा वर्षाव* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण मुर्तीजापुर अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय...

*रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही; जयकुमार गोरे यांचा निर्धार*

0
*रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही; जयकुमार गोरे यांचा निर्धार* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण सुरवडी : फलटणचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे...

*लहान वयातच वाहतूक नियमांचे संस्कार करा : सचिन विधाते*

0
मुलांना लहानपणापासून वाहतूक नियमांचे शिक्षण द्यावे सचिन विधाते; धुमाळवाडीत रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क ‘फळांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडीतील...

*सलग दुसऱ्या वर्षी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार मुधोजी हायस्कूलचा मुलींचा...

0
सलग दुसऱ्या वर्षी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार मुधोजी हायस्कूलचा मुलींचा हॉकी संघ; ऐतिहासिक कामगिरी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क . फलटण क्रीडा...

*तात्यांच्या ७५ वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव* *मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची...

0
तात्यांच्या ७५ वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती; सुरवडीत अभिष्टचिंतन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण सुरवडी, ता....

error: Content is protected !!