समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण
दि २२ जुलै २०२६ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विंचुर्णी (ता. फलटण) येथील माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फार्महाऊसवर साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर दौरा आटपून मुंबईकडे परतत असताना सायंकाळी विंचुर्णी येथील निंबाळकर यांच्या फार्महाऊसवर काही काळ थांबले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच केक कापून त्यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, फलटणचे आमदार सचिन पाटील, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, जिजामाला नाईक निंबाळकर तसेच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते.वाढदिवसानिमित्त उपस्थितांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी सार्वजनिक जीवनासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. अल्प वेळाच्या या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधत स्थानिक घडामोडींचीही माहिती घेतली. कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


























