Homeताज्या बातम्यामुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करावी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करावी

सातारा दि.13 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणेसाठी शासनाने सदर योजने https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी 18 नोव्हेंबरपर्यंत करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी केले आहे.

ई-केवायसी अत्यंत सोपी असून स्वतः महिला आपल्या मोबाईलवरुन देखील करु शकते. ई-केवायसी करताना प्रथम महिला लाभार्थ्यांनी स्वतःचे आधार कार्ड प्रमाणीकरण करावे तदनंतर पती, वडील यांचे आधार कार्ड प्रमाणीकरण करुन घेण्यात यावे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या सर्व महिला लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ज्या महिलांनी सदर कालावधीत ई-केवायसी केली नाही तर ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची नोंद घ्यावी.

योजनेच्या ज्या महिला लाभार्थ्यांची पती, वडील दोन्हीही मयत आहेत किंवा ज्या अविवाहित महिलांचे वडील मयत आहेत तसेच विधवा, घटस्पोटीत, परित्यक्त्या महिला यांचे ई-केवायसीबाबत शासनस्तरावरुन निर्णय घेणेबाबत विचार विनिमय सुरु आहे. परंतु तत्पूर्वी अशा महिलांनी फक्त त्यांचेचे आधार कार्ड प्रमाणीत करुन अपूर्ण ई-केवायसी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत करुन घेणे आवश्यक आहे. अपूर्ण ई-केवायसी पूर्ण करुन घेणेबाबत शासनामार्फत स्वतंत्र सूचना निर्गमित करणेत येणार आहे. तसेच अशा महिलांनी परस्पर इतर नातेवाईकांचे आधार कार्ड प्रमाणीकरण करु नये, असेही आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती पाटील यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘नियोजित, तालीम, अंमलात आणली?’ : केतन अग्रवाल खून प्रकरणात 3 अयशस्वी बोली, लोहगड पडणे...

तपासकर्ते गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार करत आहेत आणि अग्रवाल यांचा फोन तपासत आहेत, जो गोयल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे होता. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन...

*कृषी विभागाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार सभापती कु शिवांजली भोसले*

*कृषी विभागाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार सभापती कु शिवांजली भोसले* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आज पंचायत समितीमध्ये स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन...

*”वारकऱ्यांच्या सेवेसाठी फलटण पालिका सज्ज; पालखी तळ स्वच्छता व सुविधा कामांचा शुभारंभ”*

  "वारकऱ्यांच्या सेवेसाठी फलटण पालिका सज्ज; पालखी तळ स्वच्छता व सुविधा कामांचा शुभारंभ" समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण, दि. १ जुलै : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी...

‘बस आज की रात है जिंदगी’: केतन अग्रवालने कौटुंबिक कार्यक्रमात नाचलेले गाणे आता एक...

7 मे रोजी कार्यक्रमात सादर झालेल्या गायिका रीतू शर्माने कार्यक्रमातील आनंदी वातावरणावर प्रकाश टाकणारा एक मार्मिक व्हिडिओ शेअर केला आहे. पुणे: एकेकाळी कौटुंबिक...

लोहगड किल्ला खून: पोलिसांनी गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार केले, चेतनच्या चालीचे विश्लेषण; केतन अग्रवालच्या...

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी आरोपी चेतन चौधरी याला लोहगड किल्ल्यावर आणले आणि केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासाचा एक भाग म्हणून चेतनच्या गुन्ह्याच्या...

error: Content is protected !!