राहुल निकम यांना ज्ञानज्योती पर्यावरण संवर्धन पुरस्कार
सातारा: सध्या वाई वन विभागात कार्यरत असणारे नियत वन परिक्षेत्र अधिकारी राहुल निकम यांना ज्ञानज्योती फाउंडेशन महाराष्ट्र आणि गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 2026 चा ज्ञानज्योती पर्यावरण संवर्धन पुरस्कार ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
राहुल निकम यांनी पर्यावरण संवर्धनाविषयी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.


























